Tuesday, June 18, 2013

In praise of "अळूची पातळ भाजी".....


Saw a detailed post by Namita Tickare on the FB group Sikandlous Cuisine relating to  "अळूची पातळ भाजी" (the traditional Maharashtrian vegetable gravy preparation made with Cococaasia (Arbi)  leaves).

Though it is cooked at homes in season, along with many other delicacies like "ALuchyaa Wadya", what it really brought back, is memories of having this in wedding and thread-ceremony sit down ( पंगत ) lunch celebrations, as folks were served by different people coming by with one delicacy after another,  continuously announcing its advent, as they went down the line of seated folks, while the hosts, hands folded, walked around , urging everyone to enjoy the meal at leisure.....


(photo : Namita Tickare)

 
गठ्या गठ्यात बांधलेला अळु ,
हुश्श करत ओट्यावर मोकळा होतो ….
काय करणार ,
आज काल निव्ड्णुकीचे वारे वाहतायत जोरात …
चना दाल वाले सेक्रेटरी ,
महिला मोर्चाच्या इमलीबाई ,
अनुभव नसलेले परंतु
आवडीने भाग घेउन
स्वतःला अगदी
झोकून टाकून काम करणारे कच्चे दाणे.

सर्वएकत्र येउन हुशारीने
गरम पातेल्यात यशस्वी लढा देतात ,
आणि
जंगी सत्कारासाठी सरसावतात ….

गरम तेलाचे निरंजन ,
त्यात लसून मिरचीच्या वाती
आजूबाजूला कडाडून पडणार्या मोहरी-मेथीच्या टाळ्या ,
हळद हिंगाचे शुभ आगमन ,
आणि बेसनाचे सोनेरी आवरण नेसून
होणारे औक्षण ….
आणि अत्यंत आपुलकी ने
सर्वाना आपलेसे करणारे अळू व मंडळी ….

थोड्या खोब्र गुळाच्या अक्षता,
चिंचेचे गंध ,
आणि
अळूची पातळ भाजी
दणदणीत मतांनी निवडून येते ….

2 comments:

  1. This is such a delicious poem :) You have a way with words. Thoroughly enjoyed reading it :)

    ReplyDelete