संक्रांतीचे वेध लागले की तिळाचे लाडू , वड्या , हलवा , व गुळाच्या पोळ्या डोळ्यासमोर येतात . फेसबुक वरच्या अंगत-पंगत नावाच्या ग्रुपमध्ये आज सकाळी सकाळी दिसलेली एक पोस्ट.
विशाखा पर्वते ह्या माझ्या एका मैत्रिणीने नुकत्याच केलेल्या गुळाच्या पोळीचा , तुपासह फोटो घातला आणि तो कडकपणा, ते सुंदर वितळलेल्या गुळाचे डाग , आणि दिमाखाने मध्ध्यावर आसनस्थ साजूक तूप , बघून राहवलं नाही .
डोळ्यासमोरून जणू कणकेचे वर्षभराचे वेळापत्रक हळू हळू सरत गेले , आणि एक कविता झाली
(गुळाच्या पोळीचा फोटो , विशाखा पर्वते यांच्या परवानगीने वापरला आहे.)
भाद्रपद ते पौष ,
कणिक आणि मैदा मंडळी अगदी झोकात असतात .
मनास येईल तेव्हडा मसाज,
गरम मोहन ,
कधी कातण्याने आकार,
कधी गोल करून तळणे ,
कधी मोदकासारखं भरण्याची सवय सुटत नाही ,
आणि पुरणवगैरे मंडळींची रेलचेल.
नवीन वर्ष आणि संक्रांत येते ,
आणि
आणि ह्याच कणिक-मैदा लोकांना
एकदम आरोग्यदायी जीवनशैली आठवते ..
किसून किसून दमलेला गूळ ,
गरम तेलात फिरून फिरून घाम काढणारा बेसन ,
तडतड उडून तडकणारे
पण शेवटी अगदी पूड होऊन शरण येणारे तीळ,
आणि ह्या सर्वांच्या साठी
कौतुकाने येऊन पडणारी जायफळाची पूड;
सर्वांनी एकत्र येऊन , गुळात एकजीव होऊन ,
घट्ट डब्यात विचारात बसणे .
एरवी गोल होऊन
वक्र पृष्ठभाग गुंडाळून घ्यायची सवय असलेली कणीक,
अचानक दोन चपट्या गोल लाटयात
गुळाला सांभाळते ,
आणि लाटण्याने, हळुवारपणे शिकवून मोठे करते .
अशी हि प्रौढ गुळपोळी ,
जणू तव्या वर गरम परिस्थिती सामना करून
एखाद दोन व्रण दाखवत ,
आणि तरी सुद्धा ताठ कण्याने बाहेरच्या जगात येते.
आयष्यात हि असेच असते .
कधी ओंजारून गोंजारून,
सर्वांना एकत्र करून काम करणे,
आणि कधी
जरा स्वतःला आणि दुसर्याला
चांगली शिस्त लावून,
यशाचा झेंडा रोवणे.
बघा ना .
आपल्याला अजून पटत नाही ,
पण पोळ्यांना कधीच समजलंय .....
कणिक आणि मैदा मंडळी अगदी झोकात असतात .
मनास येईल तेव्हडा मसाज,
गरम मोहन ,
कधी कातण्याने आकार,
कधी गोल करून तळणे ,
कधी मोदकासारखं भरण्याची सवय सुटत नाही ,
आणि पुरणवगैरे मंडळींची रेलचेल.
नवीन वर्ष आणि संक्रांत येते ,
आणि
आणि ह्याच कणिक-मैदा लोकांना
एकदम आरोग्यदायी जीवनशैली आठवते ..
किसून किसून दमलेला गूळ ,
गरम तेलात फिरून फिरून घाम काढणारा बेसन ,
तडतड उडून तडकणारे
पण शेवटी अगदी पूड होऊन शरण येणारे तीळ,
आणि ह्या सर्वांच्या साठी
कौतुकाने येऊन पडणारी जायफळाची पूड;
सर्वांनी एकत्र येऊन , गुळात एकजीव होऊन ,
घट्ट डब्यात विचारात बसणे .
एरवी गोल होऊन
वक्र पृष्ठभाग गुंडाळून घ्यायची सवय असलेली कणीक,
अचानक दोन चपट्या गोल लाटयात
गुळाला सांभाळते ,
आणि लाटण्याने, हळुवारपणे शिकवून मोठे करते .
अशी हि प्रौढ गुळपोळी ,
जणू तव्या वर गरम परिस्थिती सामना करून
एखाद दोन व्रण दाखवत ,
आणि तरी सुद्धा ताठ कण्याने बाहेरच्या जगात येते.
आयष्यात हि असेच असते .
कधी ओंजारून गोंजारून,
सर्वांना एकत्र करून काम करणे,
आणि कधी
जरा स्वतःला आणि दुसर्याला
चांगली शिस्त लावून,
यशाचा झेंडा रोवणे.
बघा ना .
आपल्याला अजून पटत नाही ,
पण पोळ्यांना कधीच समजलंय .....
I really appreciate your professional approach. These are pieces of very useful information that will be of great use for me in future.
ReplyDeleteHey keep posting such good and meaningful articles.
ReplyDelete