Sunday, June 4, 2017

पाषाण उवाच ....


आपल्याकडे जुन्या वस्तू टाकून, सोसासोसाने  नवीन उपकरण घेण्याची पद्धत रूढ झाली आहे .  ब्लेंडर, फूड प्रोसेसर वगैरे याचा खूपच वापर आपल्याकडे  मोठ्या शहरातून होतो. जस, "मला पाट्यावर वाटता येत नाही ", तसच, "मला काठीने तारेवर कपडे वाळत टाकता येत नाहीत " असे पदोपदी ऐकण्यात येतं .

अश्या वेळी , मेलबोर्न मधली माझी मैत्रीण सौ. शुभदा गोखले , तिचे जितके कौतुक करावे तितके थोडेच !  एक मोठे जातं , एक छोटं , दोन खलबत्ते, एक पाटावरवंटा , ह्या गोष्टींचा नियमित वापर असतो. सोबत विजेची उपकरणे असतात , तरी पण पाट्यावर वाटलेली चटणी , डाळ , आणि रवीने घुसळलेलं ताक, वेगळंच !

माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंड मधली माझी मैत्रीण , सौ प्रीती देव यांच्या कडे ही अशीच उपकरणे आहेत . (त्यांच्या कडे कोळश्याची  जुन्या पद्धतीची शेगडी पण आहे )

एका मेलबोरनी सकाळी मागील दारी बसलेल्या ह्या मंडळींसाठी हि कविता ...
सगळे दगड दगड जमले
कि एखाद्या गावचे
सगळे लोक जमल्यासारखं वाटतं .

मागील दारी कट्ट्यावरची फरशी ,
आपल्या सख्यासहेल्यांना घट्ट धरून,
पिढ्या पिढयांचे ओझं पेलवत ,
आणि तरीही काहीही कुरकुर ना करता गप्प ...

एखाद्या द्वाड मुलासारखे दोन्ही खलबत्ते ,
इतके सुदृढ
कि त्यांना बत्त्यांनी ठोकलं ,
तरी खाली पोतं ठेऊन ठोकावे लागतं ,
नाहीतर फारशी तुटते;
आयुष्यभर दणके खात ,
स्वतः मसाले, लसूण चटण्या , दाण्याच्या चटण्या
यांच्याशी चकाट्या पिटत वेळ घालवणे
हे परम ध्येय.

ह्या उलट पाटा .
सौंदर्य वैगैरे चेहर्यावर नसतं ,
आपल्या कर्मात असतं , अश्या ठाम मताचा.
चेहर्यावर जितके व्रण, तितकं काम उत्कृष्ट.
बरोबर वरवंटा.
​एकीकडे बारश्यात सजून पाळण्याभोवती फिरणे,
तर इकडे रोज ,
पाट्यावर आरामात पहुडलेल्या
मिरच्या मीठ, कोथिंबीर, खोबरं प्रभूतींना
ओंजारून गोंजारून
निवडणुकीत हरवल्यासारखे चिरडणे.
कधीतरी डाळी आणि कैर्या लोकं
पण अनुभव घायला येतात.

दळून पूड कशी करावी ,
ह्याचा आदर्श म्हणजे जातं .
दोन गोलाकार दगडांमध्ये थोडे थोडे धान्य टाकून,
मैत्रिणीबरोबर दांडा धरून ,
फिरवलेला वरचा दगड ,
वेळीप्रसंगी दगडाच्या डोळ्यातही ऐकून पाणी येईल
आणि ते पुसायला फिरणे थांबेल,
अश्या गायलेल्या सुंदर ओव्या,
आणि ऐकत ऐकत एका मऊ जुन्या साडीवर
खाली कौतुकाने पडणारे पीठ .

​एका सुंदर सकाळी ,
नरकचतुर्दशीच्या दिवशी लौकर अंघोळी करून ​
जणू सकाळ्ळच्या उन्हात जणू
बसलेली ही सर्व मंडळी.

उलट्या ऋतूंच्या देशात असली म्हणून काय झालं?
एकत्र जमली कि तोच दसरा आणि तीच दिवाळी ....

Saturday, June 3, 2017

A Cabbage Life


One of my friends on a certain Facebook Group dedicated to Traditional Maharashtrian Cuisine posted a query pertaining to various ways people cooked cabbage.   There was a huge response.

It just occurred to me that if I was a cabbage, I would have been totally overcome.

It also occurred to me that as a cabbage , I would have something to say.

 Like everyone else , on FB .

I first said it in Marathi, and then in English.   Read.....
जन्मानी ब्रासिका ओलेराचिया,
पण लाडाने कोबी हे नाव ;
चार चौघान सारखे बालपण ,
आपले एक एक हिरवे कौशल्य उलगडत
मिरच्या कढीपत्ते आणि मोहरी मंडळींबरोबर
हसत खेळत , त्यांचे तडतडण ऐकत
घालवलेला वेळ.

आणि मग किशोर वयात
बदललेली दृष्टी ;
पाणी पियुन तर्रर्र झालेल्या डाळी ,
रंगेल टोमॅटो ,
दिसायला लहान पण तिखट वृत्तीचे आले ;
"फेर अँड लव्हली असोत आम्ही " असे म्हणत
जणू किसून धावत येऊन पडणारे खोबरं ,
"अहो थांबा की!" म्हणत धापा टाकत येणारी कोथिम्बीर ,
आणि कधी कधी तर
सर्वत्र आपला वावर कसा असतो हे दाखवत
ठामपणे आत पडणारे बेसन .

आज काळ परदेशी मेकअप आल्यापासून
कोबी स्वतःला पुनश्च ब्रासिका ओलेराचिया समजून
मॅगी मसाला ए मॅजिक लावायला शिकलीये .

पण खरं विचारलात तर
तिचा आवडता प्रकार म्हणजे
चिरून, मीठ साखर दाण्याचे कूट
कोथिंबीर मिरची घालून
लिंबू पिळून ,
वरून कढीपता हिंगाची फोडणी घालणे
आणि सटात आरामात चिंब भिजून राहणे .
आणि शंकर महादेवन सांग गुणगुणणे :
"या रिमझिम झिलमिल लिंबू धारा तनमन फुलवून 

जाती
सहवास तुझा मधुमास हिंगाचा गंध सुखाचा हाती
हा धुंद फॅन चा वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे... "
Born Brassica Oleracea,
but called Cabbage;
a childhood like all others
in India,
opening up each layer
of her being,
as she enjoyed fooling around with
chillies, kadhipatta
and angry mustard seeds.

And then a teenage
that changed everything;
Some dals ,
redolent and reeling with
the imbibed water,
casanova tomatoes,
spicy and crushing gingers,
and the Fair and Lovely grated coconut
rushing it,
followed by a
breathless set of coriander leaves.
And always,
some besan,
trying to add itself out of sheer habit .

These days, Brassica Oleracea,
has taken to adorning herself
with foreign makeup
like Maggi Masala-e-Magic.

But if you really want to know
what she loves,
it is to get together with
salt, sugar, chillies,
crushed roasted groundnuts,
coriander and lemon juice,
rejoicing under the onslaught
of a terrific hing kadhipatta tadka,
and enjoy the wet season
in a bowl,
humming Shankar Mahadevan's Song,
slightly modified :
 
"या रिमझिम झिलमिल लिंबू धारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास हिंगाचा गंध सुखाचा हाती
हा धुंद फॅन चा वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे... "