Wednesday, September 30, 2015

अरे संसार संसार......


कधी कधी , जोन्धळ्याचा,  पिठापासून भाकरी पर्यंतचा प्रवास खूप स्फूर्ती देणारा ठरतो .  आणि बरच काही शिकवून जातो

थोड्याथोड्या प्रमाणात मळलेले पीठ , थापत थापत , कधी पोळपाटावर, कधी हातावर,  मोठी होउन किशोर वयात येणारी भाकरी, तिचे तव्यावरचे आयुष्य ,  निखार्यांवर परीक्षा देउन  हृदयी फुलणे , आणि मग ताज्या लोण्याकडे धाव घेणे …

एका मैत्रिणीने भाकऱ्या बनवून, फेसबुकवर फोटो टाकले ; अगदी पिठापासून पुढे .

त्यांच्याकडे बघून कविता सुचली . ( खालील फ़ोटो विकिमिडिया वरील जाहीर मुक्त सार्वजनिक संग्रहालयातील आहेत.   )




एक हरहुन्नरी हट्टी मुलगी,
कधी पाण्यात खेळ ,कधी दुधात ,
कधी दोघानशी भांड,

आणि मग
कधीतरी लक्ष ठेउन,
परातीने तिला पकडून घरी आणलं ,
आणि समजाउन ,
पाण्याशी लाडीगोडी लाउन,
दोन चार चापट्या मारून
छान गोंजारून शेजारी बसवून ठेवलं .

तव्याने केलेल्या पलिकडून खुणा ,
आणि त्या दिसताच
तिला मिळालेला एक धापाटा,
एकावर एक तिचे गोल् फिरणे
आणि तरी धपाटे चालूच .

शेवटी धाउन आलेला उलथने भाऊ ,
त्याच्या बरोबर तव्याकडे घेतलेली धाव ,
आयुष्यातले बसलेले चटके ,
आणि उगी उगी म्हणत
कोणीतरी तिच्या मुखड्यावर फिरवलेला
पाण्याचा प्रेमळ हात ,
पुन्हा तव्याशी मुकाबला.

युद्धात आणि प्रेमात सगळाच माफ असतं ,
आणि रुसलेला तवा थोड्यावेळ
बाजूला निघून जातो,
आणि सोनेरी निळ्या ज्वाळेवर
तिला आयुष्याचे खरे चटके
आणि डाग,
न्हवे काळे टिक्के लागतात;
नव्या आयुष्याचे स्वप्न बघत ती फुलते ,
आणि मग
तव्याच्या नाकावर टिच्चून
चिमटा बाई बरोबर
कोण एकीच्या ताटात लोण्याला  शोधत जाते।

नव्या नवलाई चे नवे लोणी ;
भाकरीला कळत नाही,
कि तिच्या आयुष्याचा खरा शिल्पकार
आणि सुख दुक्खाचा भागीदार
चक्क तवा आहे .

लोण्यासार्ख्या फेर आणि ब्युटीफुल ला ती भुलते .
तवा काळा असला तरी दिलवाला आहे

ह्या आज कालच्या मुली न …

Sunday, September 27, 2015

A Grinding Life ....


One of my friends Saee Koranne-Khandekar,  from  a FB group called Rediscovering Traditional Maharashtrian Cuisine  recently posted  this beautiful capture which  was part of an article she wrote on "Pantry Essentials to get you started in a Maharashtrian kitchen".  

Go read that article to know the kitchens of our grandmothers, some aspect of which everyone strives to maintain even today.  

Some compared this composition to a "still life ' one did in an Art Class. Some went completely nostalgic.

I just wondered if  people were really using these items today in a world populated with food processors, mixers, air fryers, ovens  and the like.  I wondered if people actually used the chutney stone today, and actually knew how to grind.

I still use some of these items.

And I also wondered what the PaaTaa , or the chutney stone at the centre of the composition below, and its consort, the WarwanTaa , might be thinking about...

First posted it in Marathi. Then did an English version for my non Marathi friends.





निश्चल , स्थितप्रद्न्य ,वर्षानुवर्ष
अनेक पिढ्यांचे प्रयोग बघत
एका भिरभिरत्या पायाच्या

वरवंटाईसह
ओट्यावर भक्कमपणे विराजमान,
असे पाटे खोत,
अनेक वर्ष धैर्याने टाकी लावण्याच्या
आठवणीत अगदी रमून जातात.

कधीतरी भिजलेल्या डाळीने केलेली तक्रार ,
त्याला मिरचीने दिलेला तिखट दुजोरा
सहन केलेले, मारलेले ,
खिळ्याचे नेमके रेषांचे ठोके ,
हळुवार कधीतरी नंतर
हात फिरवून पाण्याने स्वछ् स्नान ,
आणि मग नवीन जोमाने
कधी चिंचा काटाळून मीठ लाउन गोळे करून,
शेजारच्या खाउन पियुन धष्ठ पुष्ठ
बरणीबाईकडे वस्तीला धाडणे.

कधी अस्ताव्यस्त पण शिस्तीच्या सुपाने
उडवत उडवत सोललेले भाजलेले दाणे ,
आणि ते भरड्ताना पाट्याला चिकटलेला खमंग वास ,
कधीतरी वरवंटाईने स्वतः उभे राहून चेच्लेले
लसूण आणि खोबर्याचे तुकडे ,
आणि मोठ्या उत्सवी वातावर्णात ,
शेलाट्या बांध्याच्या
हिरव्या आणि लाल मिर्च्यांने
कोथिम्बिरी व कैरीसह केलेले विक्रमी पदार्पण.

भाजलेल्या कांदाखोब्र्याला एकरूप व्हायला
केलेली मोलाचे मदत,
आणि कुणा एका नव्या नवलाईच्या तरुण बरणीत
लोणच्यासाठी वाटून गोंजारून
चढ्वून गोळा केलेली
झिंगलेली मोह्रीची डाळ.

दूरवर एका झकपक मेजावर
एक मशीन डौलदार पणे भाव खात उभे;
आणि एकिकडे
पाटे खोत वरवंटाईकडे बघतात,
सुस्कारा टाकत म्हणतात ,
" पातं असलं आणि विजेवर फिरलं ,
म्हणजे काही हुशारी नाही.;
आम्हाला कसं , आईचा हात लागतो,
पदार्थ समजतो ,
आणि आम्ही त्यात आमचा जीव ओततो.
 

ह्या आजकालच्या मिक्सर लोकांना 
कधी कळायचं ?
Supremely unshakable,
unaffected ,
by the passage of time,
watching generations go by
year after year,
PaTaa Khot sits,
firmly ensconced in the kitchen,
in the company of a Warwantaabai,
much given to rolling around,
and smiles at the memories
of having cutting makeovers done
to himself every now and then.

An occasional stare
of discomfort and disapproval
from a soaked daal,
and a bunch of chillies
splitting all over in support,
he remembers being marked
sharply with a  nail
and hammered all over ,
to restore his original stone glory;
all followed
by a gentle all encompassing bath
and a rubbing dry.

Much appreciated
by deseeded tamarind ladies,
being treated by the WarwanTabai
and a wrapping together 

with  a bit of salt,
before rushing for a year long gossip
in buxom china pots.

Then some flighty peanuts,
and their Soop Dance
as they shed covers
and roasted inhibitions,
before collecting
in a tasty sticky roasted crush
on the PaaTaa stone.

And then its the Warwantaabai,
personally standing up,
and  decimating
the coconut and garlic guys
to pieces,
much to the delight
of the siren mirchis,
corianders and kairi girls,
there for a chutney morning.

Of course,
burnt onions and roasted coconuts,
often arrive at their Waterloo,
sometimes followed
by a misleadingly languid
mustard mash,
meant to bring a zing
to a mango pickle
avidly waiting in a fancy pot.

Away to one side,
there sits  a posh contraption,
radiating page 3 attitude
and looking down its nose
at the Pata Khot and WarwanTaabai .

PaaTaa sighs, turns to WarwanTaabai,
and says,
" Some folks think
you are perfect if you have blades
that spin on electricity
so boringly same for all foods...
When will they learn
that we thrive
and hanker after
the touch of a Mother,
the feel of the food,
and the pouring of soul
into creating the dish,
as we grind  through our day ?...
"

Saturday, September 26, 2015

Kande Pohe Mornings.....


My friend Shakti Salgaokar-Yezdani just celebrated a relaxed Saturday morning, making some excellent breakfast Kande Pohe, with the tadka in ghee instead of oil.  It is probably a tradition , but most young Maharashtrian girls learn to make tea and Kande Pohe, when they start off in the kitchen.  Shakti  learned that, and at almost double her age, so did I , when i was very young.  Kande Pohe Zindabad !

Kande Pohe are almost the original brand ambassadors of day-to-day middle class Maharashtra. 

The indulgent washing of the Pohe, the fragrance of the kadhipattas ,  sharp intake of mirchi breath,  and the hing, onions, haldi , lemon juice etc  all falling in line and waiting for the Pohe..

All resulting in a uniquely  golden fresh Kande Pohe, sprinkled with Coriander leaves and Fresh Coconut.  Sometimes with a piece of lemon. 

Diehard Kokan types often serve roasted Poha papad, and Mirchi pickle ,  along with it.  

Purists tend to frown on sev and other farsan types hanging around the pohe.  Just saying ..... 

  



एका रेंगाळत्या भाद्रपद सकाळी ,
साग्रसंगीत स्नान करून
एकामेकाला धरून
रोळीत पहुडलेले पोहे,
अचानक आजूबाजूला गजबज,
आणि मिरचीबाईन्नी कढीपत्त्याला
हळूच सांगितलेली कांद्याची चुगली ;
न राहावून मोहरीचे हसून तड्तड्णे ,
आणि हिंगाने "क्या बात !" म्हणत
मारलेली कांद्याच्या फोडणीत टाळी …

चीण लाल तिखटाने ,
लिंबाच्या रसाबरोबर त्यात मारलेली उडी ,
आणि
"सकाळी सकाळी काय ही गडबड,
कोणी मेलं स्वस्थ बसून देत नाही "
म्हणत
आणि फ़ोड्णीने भारावून जाउन,
आपले सनातनी मत बदलून,
कोथिंबीर खोब्राने सालंकृत
मीठ साखरेच्या अक्षता झेलत
आत पडून
तयार झालेले सुनहरे पोहे.

आणि एक गणपतीबाप्पा
उन्दिर्मामाकडे बघतो,
हळूच कानाशी जातो आणि म्हणतो,
"मोदक आणि गोडाचा कंटाळा आला रे ,
चल, पोह्याची चव बघुया …।"
A gentle leisurely
Bhadrapad morning,
and the Pohe
sit snug
in a Rowlee,
shrugging off
the last of the water
after a fancy bath...

A sudden commotion,
as the agitated, cut up
Mirchibai
bitterly cribs
to the Kadhpatta ladies,
about the onions
making them  all cry.
The mustard seeds
cracking up in mirth
at that sight,
and the Hing lads jump in
to give them all a hi-five
in the hot oil...

A pinch of cayenne
managing an entry
along with a lemon in tears,
and the Pohe,
blurting out
"Early morning rabblerousers,
they don't let you
rest in peace, do they ?"

But the sight of  them all
sizzling together
is too inviting,
and the infatuated Pohe,
adorned with
Coconut and Coriander jewellery
rush in
amidst a confetti of salt and sugar,
to be a part
of a Kande Pohe  morning...

Away to one side,
watching it all,
Ganpati Bappa
quietly bends down,
clicks,
and whispers into the
ears of the mouse,
saying,
"Aiiyo, I've had
so much sweet stuff,
all these modaks and laddoos,
Come, lets taste
these wonderful Kande Pohe! ...
"

Thursday, September 24, 2015

नित्यनेमाने प्यावे बीनामृत....


फारसा सुग्रणपणा नसला, आणि खाण्यात इंटरेस्ट असला न, कि कविता सुचतात .

फेसबुक वर कधी कधी  उपयुक्त माहिती मिळते .  

आज सकाळी  एका मैत्रिणीकडे ताजे पावटे होते , आणि तिला त्यांचा पुलाव बनवायचा होता .  सहज  तिने फेसबुक ग्रूप वर सवाल टाकला , आणि   इतक्या लोकांनी उत्तरे दिली कि चक्क सकाळी सकाळी  "बीनामृत "  प्यायल्ल्याचा आनंद मिळाला.

किती प्रकारच्या सोललेल्या  शेंगा, कडधान्य वाल, त्यांचे विविध रंग, आकार,  स्वभाव, व त्यांच्या भाज्या बनवायच्या पद्धतींबद्दल खूप समजलं …।

मग उगीचच  वाटलं ,  आपल्यात सुधा किती विविधता आहे आणि माणसांना सुधा त्यांच्याकडून थोडे फार शिक्ण्यासार्खे आहे ….

 


ह्या सगळ्या शेंगा , आणि बीन्स
म्हणजे छोटा भारतच अहेत.


कोणी जुन्या पद्धतीच्या आवरणात ,
कधीतरी रात्रभर अभ्यन्ग्स्नानात गुंग,
मग
सकाळी कपडे बदलून स्वस्थ
आणि कधीतरी मग
"मोड भव" असा आशीर्वाद मिळून,
नव्या कशाची तरी चाहूल .

कोणी स्वतःला फेर अंड लव्हली समजून
पाण्यात मनोसक्त डुंबून,
वाफेचे फ़ेशल करत ,
कुणा कुणाच्या शिट्ट्या ऐकत
नविन दिवसाला सज्ज…

कोणी मुळातच कमनीय श्यामल वर्ण सुंदर्या ,
ह्याही पाण्यात विहारतात,
आणि वाफेशी खेळता खेळता लाझून
पाण्याला गुलाबी करतात .

काही शांत , गडद काळ्या घेवड्याचे वंशज ,
कोणाशी न मिसळता
कांदा लसुणाची स्वप्न बघत
आपल्याच धुंदित मग्न।

श्रावणात बाहेर न पडलेले घेवडे ,
आपपाल्या शेंगातून ,
"श्रावणात घननिळा" गात ,
गुलाबी छटा दाखवत भाद्रपदात बाहेर
आणि
आपले गाव सोडून
देश बघायला बाहेर पडलेल्या
दुरंगी राज्म्यान्नॆ त्यांचे केलेले स्वागत

एकिकडे अचानक मग भाज्यांच्या निवडणुकीत
पार्टीने तिकीट दिल्याच्या अहंकारात
पावट्याञ्चा उग्र पावित्रा …

रंग, रूप, जात, कूळ कुठलेही असो ,
कोणि एकट कधीही नसत ;
सगळ्यांच्या विकासासाठी
कांदे , लसून, आले, खोबरं , मसाले , चिंच,
टोमाटो , जिरे
हे सर्व आणि बरेच कोणी ,
राष्ट्रीय शेंगा उत्कर्ष अभियाना तर्फे
कायम हजर असतात.

आज
ऐक्य आपल्याला समजत नाही
पण शेंगाना कळतं न !

Wednesday, September 23, 2015

The First Pithla War....


Someone asked about Ravan Pithla, and my friend Anjali Koli wrote a blogpost describing the Ravan-like qualities of the Pithla in question :  a angry red besan roasting, matching amount red chilly powder, and the works, all designed to get your tears to flow. So typical of the ten headed demon Ravan , the villain of  Ramayana.

As someone who has always supported the underdog, this is a shoutout for the amazing Kulthaacha Pithla, or Pithla made of roasted Horsegram flour, something so native to Kokan , Maharashtra's coastal area.

(It is known that before setting out on campaigns from his forts, with his armies, Shivaji Maharaj, along with his faithfuls, would always imbibe  big  bowlfuls  of  a  gruel made from cooking horsegrams in water, and this was considered great for stamina since it was excellent protein.... )

I mean the Ravan Pithla might sound powerful, but is not a patch on the magic of Kuleeth.

Clearly, even Oryza Sativa***  thinks so ....




घासून सोनेरी पितळेचं ताट ,
त्यात वाफाळलेली भातबाई ,
आणि
आपल्याच आसपासच्या धूसर धुंद वातावरणात
तिला लागलेली पिठल्यानची चाहूल .

कधी देशावरचे गोरे बेसन
भ्हार्दस्त्पणे तेलात मग्न ,
कधीतरी रागाने रंग बदलणे,
कम्युनिस्ट मिर्च्यांशी युती करणे ,
आणि कढीपत्ताबाईनकडे दुर्लक्ष करून,
आतुरतेने ताकाची नाहीतर पाण्याची वाट बघणे.
कधी जिरे खोबरे लोकांनी केलेली मदत,
कधी कोथिम्बिरीचे समजावणे,
आणि मग तव्यावर सोन्यासारखे रुसून बसणे

पण मग कधीतरी
कोकणचे काटक कुळीथ ,
परिस्थितीने भाजून निघालेले,
आणि कुणा एका सुनेने
पहाटे पहाटे जात्यावर
ओविबध्ध दळलेले,
पुढच्या दारी आलेला खमंग वास ,
मग कांदा लसूण मिरच्यांन बरोबर
एका लोखंडी कढईतल्या
गरम तेलात पाण्याला बरोबर घेउन उकळून पदार्पण;
आणि मग घरच्या अम्सुलाने
गडबडीने घेतलेली ग्रेट भेट ,

गरम सुस्कारा टाकत
आसुसलेली भातबाई,
बाजूला बसलेल्या मिठाला खुणावते ,
पोह्याच्या भाजलेल्या खमंग पापडाकडे
डोळे लाउन बसते ,
आणि
म्हणते ,
"राम काय, रावण काय,
मला तर बाई कुळीथाशिवाय काही सुचतच नाही हो !"
 She sits,
Oryza Sativa*** ,
wrapped in a
hot mist
of her own making,
on a scrubbed golden brass plate,
anticipating the Pithla Arrivals.

Sometimes,
a fair Besan man,
gambolling in hot oil,
perhaps dark in anger ,
sometimes secretive
with cracking comments
with communist chillies
at the cost
of the demure kadhipattas;
then a severe thirst
for water or buttermilk,
with some cumin and coconut
brokering a peace,
and a final stubborn
place pouting
and protesting on the griddle.

And then sometimes
the dark and handsome Kuleeth,
Horsegram to you,
hardy as they come in Kokan,
emerging hot
from a tough roasting,
crushed fine , milled, 

and simply infatuated by the songs
of the  lady-of-the-house  at dawn,
as she grinds them, 

amidst the fragrance
streaming out of the front door.

A great meet up
with spicy  Onion and Garlic ,
willing cooperation with the
red chillies
and a complete dissolving
in joy
in the water,
as the situation
comes to  a boil

in cast iron,
amidst pieces of kokum
giving the finishing touch.

Oryza Sativa,
takes a deep steaming breath,
raises her eyebrows
at the salt sitting
to the side,
pines for the roasted Poha Papad,
still on its way,
and says,
"Whether it is Ram, or Ravan Pithla,
power doesn't attract me;
For me, the choice is always the Kuleeth !..."


***Oryza Sativa :  Fancy cradle name for Rice :-)

Masala Stories


My friend , Anjali Koli, who is a food blogger at Annaparabrahma,  recently collaborated with Chef Ranveer Brar   on the Great Indian Rasoi 2 program , an epic culinary journey across India,  on the Living Foodz Channel.

She demonstrated the a traditional (Dried)  Shrimp Masala preparation,  under the benevolent gaze and active participation of the  various Mavshis present.   The location was the precincts of the Khandoba temple, the patron godof the Kolis, the original inhabitants of Mumbai.

The program inspired a vegetarian like me to compose an ode to the entire preparation and celebration, with Anjali and Chef Brar.  First inspired in Marathi; but then wrote an English version for Chef Brar.....   :-)

Do watch. And wish you were there .....





तेलात चकाकले शुभ्र कांदे ,
हळूहळू झाले सोने ,
जणू मावशीन्च्या नाकी चमके

साग्रर मोत्याची नथ;
फटाकड्या हिरव्या मिरच्या
तुटून पडती त्याञ्च्यावर ,
आणि कुणा एका ब्रारला ठसका लागताच,
मावशी मान डोलवून ,
गळ्यातलं चाचपडून,
टीव्ही क्यामेरा कडे बघून
"अगोबाय !" हसू पडे …
अंजलीचा हात लागताच
"इश्श, मी येतच होते…" म्हणत
स्वतःला त्यात झोकून देणारी वांगी ,
स्वादात डुंबत आतुरतेने
चिंब
कोळीमची वाट बघणारे सगळे ,
कोळी मसाल्याच्या होडीच्या
तवा वापसीचा अपूर्व जल्लोष;
आणि मग कोवळ्या पण जबाबदार
हिरव्या कान्दापातीचे आगमन ,
आणि त्यांचे बोट धरून
हट्टाने टीव्ही वर आलेले कोकम .

सर्वांवरी एक झाकण ,
आसमंतात मावशीनचा फुललेला चेहरा,
एक दणदणीत वाफ
झाके मावशीनचा चष्मा.

गोड तांदुळाचे वडे
वाट बघती
कोळीमची,
परवानगीसाठी बघती अन्जलीकडे .

आणि कोळी बांधवांचे अदरातिथ्य बघूंन
अन्जलीचे कौतुक करून
ब्रार भारावून जातो,
आणि
देवा  खंडोबा
समाधानाने सागराकडे एक दूर कटाक्ष
टाकत
म्हणतात ,
"मी अनेकदा टीव्ही वर
आलो रे ,
पण सर्वाना घेउन अंजली आली ,
फार छान वाटलं !"
White onion slivers
glistening in hot oil,
with a tinge of
pale polished  gold,
like the Pearly nosering
adorning Mavshee's nose;
 

Item number mirchis
rushing in
all cut up and
doing their stuff,
causing a Brar to cough,
and a Mavshee to nod
and crack up,
quickly adjust her necklace,
and surprise the camera
with a heartfelt "Agobaya!"....

And the brinjals,
falling on to the tawa
at the slightest Anjolian nudge,
waiting and sizzling
for the tiny shrimp,
inebriated with water.

The celebrated Tawa Wapasi
of the Koli Masala,
spicing and saffronizing it all,
and they agitate and stir
as streaks and cuts
of green onion,
lugging some Kokam
enter the scene.

A great cooking
behind closed lids,
steaming and tearing,
and the shrimp are done
amidst a  clouding
of the specs of a Mavshi
checking it out
and waiting for it all...

A thrilling welcome from
Sweet Rice Wadas
impatient to hold close
the shrimp masala.

And as the Brar sits,
biting into 

the wada and the shrimp,
overcome
with the Koli Hospitality,
the resplendent Khandoba
watching it all,
looks at a shining sea
in the distance,
and says,
" You know what,
I've been on TV many times,
but this one
with Anjali and friends
is special indeed !
".....