Wednesday, November 3, 2010

दिवाळीची कलाकुसर

थोड़ी कोकणात , थोड़ी माळवयात ...... Wordless!

काही पहाटे पहाटे
सूर्य वेळेपेक्षा खूप आधी
वर येतो ,
कारण समुद्राच्या वाळूत
‘दिलवाले’ टाईप पोझ मध्ये बसून
कोणी दोघं बोटांनी रांगोळी काढत असतात ……..
आणि
काही काही संध्याकाळी
सूर्य जाताना रेंगाळतो ,
कारण
माळव्यातल्या इंदोरी भूमीवर
दुसरीच एक सुंदर रांगोळी
दिव्याच्या प्रकाशात
होत असते ……..
(तेवढ्यात ती वर बघते ,
एक दीर्घ श्वास घेते ,
आणि म्हणते ,
“वाह! , तुपाचा आणि बेसनाचा
काय छान वास येतोय न …..?”
:-)

27 comments:

  1. out of this world :) a very nice diwali gift for us I must say :)

    ReplyDelete