Saturday, December 2, 2017

श्रीखंडाचे मानसशास्त्र ​ ...


पुरीचा अथवा पोळीचा तुकडा श्रीखंडात बुडवून खाणे या सारखे दुसरे सुख नसावे .

पण ....

श्रीखंड बनवण्यासाठी काय काय करावं लागतं , ह्या मागे काहीतरी मानसशास्त्र आहे .  तुम्ही दही असलात तर तुम्हाला ते कळेल .  त्यात आपल्यालाही काहीतरी शिकण्यासारखं  आहे .

तुम्ही म्हणाल श्रीखंडा सारखा सुन्दर पदार्थाचा आस्वाद घेताना हे मानस शास्त्र कुठून आलं ?   काही लोकांना काही कारणास्तव मनोसक्त श्रीखंड खाण वर्ज्य असतं. 

त्यांच्या ह्या कविता लिहिण्यामागे सुद्धा एक मानसशास्त्र असतं   :-)


एका कोमट दुधात
हळूच केलेला चमचा-दोन चमचा शिरकाव ,
पटकन एकजिव होऊन झाकणाखाली लपणे ,
आणि रात्रभर आपले उपदव्याप करून
सकाळी
"मी काहीच केले नाही , मला का विचारता ?"
म्हणत घट्ट दह्याखाली मजेत बसणे .

पण नियती लक्षात ठेवते .

कधीतरी ह्या दह्याला ,
कोशिंबिरी, वडे , इत्यादींमध्ये न घालता
एका पंचात , नाहीतर उशीच्या अभ्र्यात गच्चं बांधून
चक्क टांगलं जातं ,
आणि रात्रभर , आपल्या पूर्व कर्माची फळं भोगत
दह्यातलं सर्व पाणी रागवून निघून जातं ;
कधी कधी एखादा पाटा पण ह्या बांधलेला दह्यावर ठेवला जातो,
जेणेकरून दह्याच्या अश्रूंचा लवलेशही नाहीसा व्हावा .
आणि ह्याला चक्क चक्का म्हणतात ...

प्रत्येकाचे कधीतरी चांगले दिवस येतात ,
त्या प्रमाणे चक्क्यात केशर, इलायची , साखर, पिस्ते
घालून पदार्थ बनतो
आणि खूप कौतुकाचा होतो.

एव्हडं मात्र खरं .
आपण दुसर्यावर केलेले वार, पुढे आयुष्यात आपल्यावर होतात
हे दही समजून चुकतं .

आणि तरीही हे प्रकार अखंड अविरत चालू असतात .
आपल्या आणि दह्याच्या आयुष्यात .....

3 comments:

  1. It was terribly helpful on behalf of me. Keep sharing such ideas within the future similarly. This was truly what i used to be longing for, and that i am glad to came here! Thanks for sharing the such data with USA.

    ReplyDelete