फेसबुकवरील माझा मित्र अरित्र दास याने नुकतेच एक आवोकाडो विकत आणून , त्याचा ग्वाकमोले नावाचा पदार्थ बनवायचा यशस्वी प्रयत्न केला . आनंदाच्या भरात फोटो काढला आणि फेसबुकी टाकला . गोंधळ एव्हडाच की ह्या सर्व प्रयत्नात फोटोमध्ये हिरवा रंग पिवळा दिसू लागला .
चरित्र दास ने मग "ग्वाकमोले पिठलं" म्हणून ह्या पदार्थाचे नामकरण केले .
मला उगीचच ग्वाकामोले साठी वाईट वाटलं . प्रेसिडेंट म्हणावं आणि ओबामा च्या ऐवजी ट्रम्प ने समोर यावं असं थोडंसं झालं .
वाचा .....
अवोकाडो परिवारात
तसं सर्वांना खूप "कडक " शिस्तीत
वागावं लागे .
बाहेरच्या जगात पदार्पण कारण्यासाठीसुद्धा
अवोकाडोच्या देठाची परीक्षा;
मऊ किती, फळाच्या देठाशी रंग कसा ,
वगैरे तपासण्या .
असच एक फळ अचानक अरित्राच्या हाती लागले,
आणि अगदी प्रचलित पद्धतीप्रमाणे
एक मोठे बीज काढून
आतला गर हाती आला .
एखाद्या आळणी देशात स्वाभाविकपणे भेट द्यावी
असं ह्या घरात पडायला
तिखट मिरच्यांचे आणि मवाळ टोमॅटोचे आगमन ,
आणि मीठ , साखर, इत्यादींचा दुजोरा .
आपल्या मूळच्या देशातल्या
"ओले ओले !" च्या ऐवजी
"आले आले !" म्हणत ग्वाकमोले बाईंचे पदार्पण.
मग कोणीतरी येऊन फोटो काढणे
फेसबुकवर टाकणे
आणि त्यांना ग्वाकमोले पिठलं संबोधणे ...
"Mi nombre no es pithla"
Mi nombre es Senorita Guacamole! "
अरित्र, तुला मेतकूट म्हटलं तर चालेल का ?
ह्यावरअरित्र ने उत्तर दिलं , "चालेल!" !!!
तसं सर्वांना खूप "कडक " शिस्तीत
वागावं लागे .
बाहेरच्या जगात पदार्पण कारण्यासाठीसुद्धा
अवोकाडोच्या देठाची परीक्षा;
मऊ किती, फळाच्या देठाशी रंग कसा ,
वगैरे तपासण्या .
असच एक फळ अचानक अरित्राच्या हाती लागले,
आणि अगदी प्रचलित पद्धतीप्रमाणे
एक मोठे बीज काढून
आतला गर हाती आला .
एखाद्या आळणी देशात स्वाभाविकपणे भेट द्यावी
असं ह्या घरात पडायला
तिखट मिरच्यांचे आणि मवाळ टोमॅटोचे आगमन ,
आणि मीठ , साखर, इत्यादींचा दुजोरा .
आपल्या मूळच्या देशातल्या
"ओले ओले !" च्या ऐवजी
"आले आले !" म्हणत ग्वाकमोले बाईंचे पदार्पण.
मग कोणीतरी येऊन फोटो काढणे
फेसबुकवर टाकणे
आणि त्यांना ग्वाकमोले पिठलं संबोधणे ...
"Mi nombre no es pithla"
Mi nombre es Senorita Guacamole! "
अरित्र, तुला मेतकूट म्हटलं तर चालेल का ?
ह्यावरअरित्र ने उत्तर दिलं , "चालेल!" !!!