Tuesday, October 24, 2017

पदर पदर परि शेवटी ......


फेसबुक वरील  महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीशी निगडीत  , "अंगत पंगत " असा ग्रुप आहे .  दिवाळी निमित्त अनेकांनी फराळाशी संबंधित पोस्ट्स लिहिल्या आणि फोटो टाकले .

उमा कुलकर्णी नाईक यांनी  विवध पदर वाल्या कारंज्यांचा एक सुंदर फोटो टाकला , आणि  शिवाय , खुसखुशीत आणि चविष्ट  करंज्यांबद्दल, आजींच्या कडून ऊसफूर्त शाबासकी मिळवली.

उमाताईंचे खूप अभिनंदन .

 असे पदर बघितले कि मग कविता सुचतात .   अशीच एक ....




दीपावलीच्या सागरातले
असंख्य पदरवाले शिंपले जणू
पदर पदर घट्ट धरून

आतल्या बच्चा मोत्याला सांभाळत.

हे ऑईस्टर शिंपले

नवीन मोत्यासारख्या तेजपुंज जीवाला
जगातील
भांडणं , दुःख , हेवेदावे , खुन्नस ,
आणि एकटेपणाच्या त्रासापासून
दूर ठेवणारे पदर;
जागतिक तापमानवाढ,
आणि त्याच्या वाढीला उत्तेजन देणार्या
ट्रंम्पासुरा पासून दूर ठेवणारे पदर;
स्वार्थी , नद्यानचे गटार करणाऱ्या मानवापासून
दूर ठेणारे पदर ,
आणि
जनावरांना छळणाऱ्या मानवापासून दूर ठेवणारे पदर .

आणि मग ह्या दिवाळीत ,
नाजूकपणे पदरामागून डोकावणारे
सारण बाळ ,
सर्वांना शुभेच्छा देऊन आनंदित करणारे
सारणबाळ ,
आणि एका आईने कौतुकमिश्रित प्रेमाने
एक तुकडा मोडून आपल्या मुलीला देणे ,
आपण स्वतः घेणे ,
आणि सुंदर खुसखुशीत आस्वाद घेणे .

इतक्या सर्व पदरातून बाहेर पडणं सोपं नसतं .
आणि सारणबाळाला समजतं , की
आपल्यासाठी श्रम घेणारे खूप आहेत .
त्यांच्या चिरोटे मंडळींचे विशेष कौतुक.
दोन्ही चिवड्यांवर विशेष जबाबदारी.
ज्येष्ठतेमुळे लाडूंवर उत्तरदायित्व,
आणि मग सर्व फराळ मंडळी
खास दिवाळी निमित्त प्लेटींमध्ये विराजमान होतात.

खास मोत्यासारख्या बाळाचे
सोनेरी दिवस ,
आणि दिवाळीनिमित्त एका वेगळ्या जगाची ओळख .