Sunday, January 22, 2017

एका जेवणाची दुसरी गोष्ट Alternate Food Stories....


My friend  Aruna Sambhare recently prepared this lovely traditional Marathi meal, consisting of Rice, Varan(Dal), Puris, Shrikhand,  a mixed Koshimbir(Salad),  a Palak sabji, and a Upwaas Potato sabji. The piece de resistance was the Walache Birde, a traditional Kokan preparation using field beans. 

And then she posted a photograph.

This photograph is a living example of folks feeling full after a look at the photograph. Excellent for those of us  who would otherwise go haywire enjoying it all, and let their diet go for a toss.

I had my fill, both of stomach and heart.  A full heart often waxes poetic.

First in Marathi , and then, an English effort.....


काय दिवस आले आहेत ,
कि कुटुम्ब म्हटलं की
आपल्याला विभक्त कुटुंब दिसतं ,
आणि एकत्र कुटुंब फारशी दिसत नाहीत .

आज काल दिसत नाही ,
पण हे ताट कुटुंब ,
अगदी एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे राहणारे .

भातराव आणि पुरीभाऊ
सख्खे भाऊ ,
अगदी गुण्या गोविंदाने राहणारे .
भातरावांची पत्नी वरणा,
तूप मीठ लिंबाचे अलंकार घालून नेहमी हजर.
पुरीभाऊंची पत्नी श्रीखंडा
मोठ्ठया घरातली,
आणि येऊन जाऊन असणारी;
कदाचित,
पुरीभाऊंची रस्साबाईंशी असलेल्या जवळीकीची
तिला कुणकुण लागली असावी ,
पण ती तसं दाखवत नाही ,
आणि नेहमी पुरीभाऊंशेजारी उभी .

त्यांचे सुपुत्र पालक भाजीराव,
कांदा-दाणेकूट मस्तानीच्या नादी लागलेले,
आणि माहित असूनही,
पुरीभाऊ आपल्याला काहीच दिसलं नाही,
अशा अविर्भावात कोशिंबीरीला मध्ये घालून स्वस्थ.

भातरावांचे ज्येष्ठ पुत्र बटाटेराव ,
यांचा फराळी पद्धतीने कुटुंबात वावर ;
जिरे, कढीपत्ता , कोथिंबीर, खोबरे,
यांच्याशी उपास स्टाईल सात्विक जवळीक.

पण दिसतं तस नसतं,
आणि वालोबाराव बिरडे ,
हे कोकणातून आपला हक्क सांगायला आले ,
आणि बटाटे रावांच्या मनात जिरे कुचकुचले.

पुरीभाऊ आणि सौ श्रीखंडा बघत असता ,
बटाटे रावानचे स्थितप्रद्न्य असल्याचे अविर्भाव,
पण मनात दुसरंच.
आणि एकीकडे वालोबाराव बिरडयांची
हळूच भातरावांकडे मसालेदार ओली वाटचाल .

इतिहास सांगतो, कि पेशवाईचा अस्त झाला .

सद्य परिस्थिती अशी आहे ,
अरुणाराजे सांभाऱयांनी जेवायला आमंत्रण दिले आहे,
आणि ह्या स्वयंपाकी पेशवाईचा अस्त झाला नाही,
तरी सगळं पटकन फस्त मात्र होणार आहे
हे पक्कं !
What have we come to,
when the mention of "Family"
makes us think
of a Nuclear family,
and not a Joint family ?

We don't see any these days,
but the TaaT Family,
is clearly a Joint family.

Monsieur Rice and Herr Puri,
blood brothers,
living happily
as members of the Joint family.

Rice's wife, Varana,
is always around
decked up
in ornaments of ghee, salt and lemon.

Herr Puris's wife
Shrikhanda,
hailing from a rich family,
kind of comes and goes.
Perhaps she is unaware
of the whispers
linking Herr Puri, with
the spicy Rassaabai,
or she knows
but it doesn't show
as she takes her place
next to Puri.

Their son, Palak Bhajirao,
cooking up an affair
with the Onion-Groundnut Mastani,
and Herr Puri,
ignoring and pretending
that he has seen nothing,
as he pushes the
Koshimbir salad between them.

Monsieur Rice's eldest son,
Potatorao,
occasionally involving himself
with family stuff,
pretending to be Satvik,
associating with
Cumnins, kadhipattas , Coriander and Coconut.

At some point
the secret is out,
and Valoba Birde,
of the Kokan Birde's
arrives to stake his claim
as a descendant of Monsieur Rice.

Monsieur Puri and Shrikhanda
watch this,
all agape,
and although Potatorao
is troubled by the news
he pretends to be detached
about it all,
as Valoba Birde
slowly moves in a masala stream
towards Monsieur Rice.

Much like the History of the Peshwas,
and the sun setting on it
at some point.

The current situation
describes an invitation to dine
by Aruna Saambhare,
and although the Food Peshwas 
continue their reign,
folks are simply going to
finish it all , despite them.   

Tuesday, January 10, 2017

पोळी गुळाची......


संक्रांतीचे वेध लागले की तिळाचे लाडू , वड्या , हलवा , व गुळाच्या पोळ्या डोळ्यासमोर येतात . फेसबुक वरच्या अंगत-पंगत  नावाच्या ग्रुपमध्ये आज सकाळी सकाळी दिसलेली एक पोस्ट. 

विशाखा पर्वते ह्या माझ्या एका मैत्रिणीने नुकत्याच केलेल्या गुळाच्या पोळीचा , तुपासह फोटो घातला आणि तो कडकपणा, ते सुंदर वितळलेल्या  गुळाचे डाग , आणि दिमाखाने मध्ध्यावर आसनस्थ साजूक तूप ,  बघून राहवलं नाही . 

डोळ्यासमोरून जणू कणकेचे  वर्षभराचे  वेळापत्रक हळू हळू सरत गेले , आणि एक कविता झाली

(गुळाच्या पोळीचा फोटो , विशाखा पर्वते यांच्या परवानगीने वापरला आहे.)  



भाद्रपद ते पौष ,
कणिक आणि मैदा मंडळी अगदी झोकात असतात .
मनास येईल तेव्हडा मसाज,
गरम मोहन ,
कधी कातण्याने आकार,
कधी गोल करून तळणे ,
कधी मोदकासारखं भरण्याची सवय सुटत नाही ,
आणि पुरणवगैरे मंडळींची रेलचेल.

नवीन वर्ष आणि संक्रांत येते ,
आणि
आणि ह्याच कणिक-मैदा लोकांना
एकदम आरोग्यदायी जीवनशैली आठवते ..

किसून किसून दमलेला गूळ ,
गरम तेलात फिरून फिरून घाम काढणारा बेसन ,
तडतड उडून तडकणारे
पण शेवटी अगदी पूड होऊन शरण येणारे तीळ,
आणि ह्या सर्वांच्या साठी
कौतुकाने येऊन पडणारी जायफळाची पूड;
सर्वांनी एकत्र येऊन , गुळात एकजीव होऊन ,
घट्ट डब्यात विचारात बसणे .

एरवी गोल होऊन
वक्र पृष्ठभाग गुंडाळून घ्यायची सवय असलेली कणीक,
अचानक दोन चपट्या गोल लाटयात
गुळाला सांभाळते ,
आणि लाटण्याने, हळुवारपणे शिकवून मोठे करते .
अशी हि प्रौढ गुळपोळी ,
जणू तव्या वर गरम परिस्थिती सामना करून
एखाद दोन व्रण दाखवत ,
आणि तरी सुद्धा ताठ कण्याने बाहेरच्या जगात येते.

आयष्यात हि असेच असते .

कधी ओंजारून गोंजारून,
सर्वांना एकत्र करून काम करणे,
आणि कधी
जरा स्वतःला आणि दुसर्याला
चांगली शिस्त लावून,
यशाचा झेंडा रोवणे.

बघा ना .

आपल्याला अजून पटत नाही ,
पण पोळ्यांना कधीच समजलंय .....

Monday, January 9, 2017

एका खाकऱ्याची गोष्ट ... The Khaakra Philosophy....


My FB friend  Shivangi Datar, made these excellent Khaakras from leftover chapaties or Polis. She posted this amazing photo, making me wonder how perfectly matched the khaakraas and the basket were, and what an amazing pair they  made.

Then folks started writing in about having these with salt, masalas, and chilly powder, and butter and ghee ,  and Shivangi herself mentioned dunking them in a raita of curds, tomatoes and cucumber.

I cannot enjoy these , in a virtual world.

All I can do is honor them with poetry , first in the Chhatrapatis's language, and then in the Queen's...



टेबलाच्या मध्यभागी ठेवलेला
पोळ्यांचा कॅसरोल डब्बा.

इतकी महत्वाची जागा ,
आणि भाजी, आमटी, कोशिंबीर, आणि श्रीखंड,
यांच्या घरी येणे जाणे ,
त्यामुळे पोळ्या अगदी टेचात .

मग अचानक खुर्च्या सरकावल्याचे आवाज,
दूर जाणारे आवाज,
आणि सहा पोळ्यांना झालेले अतीव दुःख .

हळू हळू भात, भाजी, आमटी, लोक शीत पेटीत
आणि पोळ्यांचा सर्वात कठीण काळ
कॅसरोल कोठडीत एकांतवासाची शिक्षा....

कुठेतरी देव असतो ,
आणि कुठेतरी शिवांगी असते.

रुसलेल्या पोळ्यांना एकावर एक ठेऊन,
गरम कोरड्या तव्यावर
मऊ कापड हातात घेऊन
दाबून फिरवत ,
तिने "उगी उगी " म्हणत पटपट फिरवणे.
एकेकीला पालटून पुन्हा फिरवून समजूत काढणे.

थोडेसे डाग तर पडतात ,
पण जसं टी. व्ही वर म्हणतात,
"दाग अच्छे है" ,
आणि एक एक पोळी ,
कडक अटेंशनमध्ये सोनेरी कडा दाखवत
एका सुंदर टोपलीत येऊन
आसनस्थ.

आता आयुष्यात
तिखट-मीठ, लोणी, मसाले, सैंधव, तूप,
असे सालंकृत सजून वावरणे ,
मधूनच न राहवून
अमृततुल्य चहाच्या कपाने जवळ येणे ,
आणि कधी कधी
सगळ्याच घडामोडी गरम व्हायला लागल्या ,
कि धावून
काकडी टोमॅटो नि सजलेल्या दह्यात बुडवून
चित्त गार करणे.

पोळी तशी विचारवंत,
आणि आपल्या प्रारब्धाचा विचार करणारी .

आपण ठरवतो काय आणि होतं काय !
आणि आपण त्यातच सुख मानून ,
नवीन आयुष्याला सामोरं जायचं असतं ...

कधी कधी वाटतं ,
पोळी कडून आपल्याला शकिण्यासारखं किती असतं !

The chapati casserole box
supreme at the centre of the table.

On backslapping and visiting terms
with the
Bhajis, Amtis, Koshimbirs and Shrikhand,
the Polis move amongst all
with  great importance.

And then,
the sudden noise of chairs scraping,
footsteps going away,
and the six of them that are left
almost in a sad depression.

The Bhat, Bhajis, Amtis and others
retiring to the fridge,
and they are left,
although together,
in an almost solitary confinement.

But there is a God
and yes, there is a Shivangi...

She piles them up,
roasting the one at the bottom,
on a hot dry griddle,
comforting it and pressing it,
moving it around,
with a soft cotton cloth,
and gets each of  them done.

A few black spots
here and there,
but totally unconcerned,
flaunting their golden edges,
they sit stiffly,
at attention,
resplendent in a lovely basket.

Life is now all about
being showered with spices,
slathered in butter,
and preening as the cup of tea
surreptitiously steals a look;
then perhaps,
if things get hot,
a cooling dip
in a bowl of curds
adorned with tomato and cucumber .

The erstwhile Chapati or Poli,
now an upright Khaakra
a leading light
of the Snacks Community,
is actually philosophical.

What we plan,
and what our future actually holds
maybe so different;
and ours is
only to face it
and continue to do
the best we can,
cheerfully.

Hearing this Khaakrra Philosophy,
there is so much for us humans,
to  learn ,
isn't there ?