मनाचे कप्पे .
काहींच्या मनाचे कप्पे तुमच्यापासून त्या निळ्या दरवाज्यासारखे बंद असतात; आतल्या आत , कधीकधी अनागोंदी , अव्यवस्था , आणि गोंधळ , आणि मग अचानक कधीतरी मनातली एक अर्धवट खिडकी उघडू पहाते; एक मूक निशब्द आर्त हाक असते, आणि मदतीसाठी खिडकीतून बाहेर धरलेला अदृश्य हात असतो . आपण तो पकडायचा असतो, आणि खिडकीच्या आतल्या मनाशी संवाद साधायचा असतो जेणेकरून आतला गोंधळ व अनागोंदी , आटोक्यात येईल . यश येईल जेव्हा खिडकी सोडून मन आपले सर्वात मोठे मनोद्वार उत्साहाने उघडून आपल्याशी संवाद साधेल. मग आपल्याला कितीही उंच चढावं लागलं तरी चालेल . मनातल्या मनात जगायचा नसतं; पण जगाशी संवाद साधून श्रीमंत व्हायचं असतं ..... |
Some minds, perhaps loaded to the brim with brownian thought motion, confusion and chaos, keep themselves shut from you, like the blue door; suddenly , at some point, a mind window opens, like a silent scream , holding out an invisible hand for help. It is ours to hold it, comfort it, and talk to it, so as to reduce the chaos and confusion inside. Perhaps the mind will learn, communicate, and perhaps, open up the biggest door it has. It is up to us , to rush in there to help. It does not matter how high one has to climb. Looking inward is not living. And holding a dialogue with the world around you, enriches you immeasurably. |
Between A Million And A Billion
4 weeks ago
No comments:
Post a Comment