भाताचं आणि डाळीचं एक समीकरण असतं .
शक्यतो भातानी कुठेही एकटं नाही जायचं .
कधी एखादी श्रीमंत लोण्यात गुंग अशी डाळ,
कधी मेथी, पालक लोकांशी विचारपूर्वक युती केलेली डाळ ; कधी कधी तर भांडून भांडून दोन डाळी एकत्र येऊन अद्रक लसूण टोमॅटोमध्ये रमलेली डाळ; आणि कधी कधी सात्त्विकतेचा परमोच्च अविष्कार असलेले साधं वरण .
त्यामुळे जेव्हा काही बाळबोध डाळी ,
शिजतानाच भातात पडू लागल्या ,
आणि बरोबर फोडण्या, कढीपत्ते , जिरेपूड
घेऊन मिसळू लागल्या ,
तेव्हा भात अगदी हुरळून गेला .
अति मसालेदार खाणे,
दमून भागून कुठून तरी येणे ,
पटकन काहीतरी बनवणे भाग पडणे
इत्यादी कारणाने
ह्या "खिचडी " चे उद्घाटन झाले ,
आणि आज तागायत विवध वेळी,
विविध प्रकारात ती देशभर उजळून निघाली .
आपल्याकडे जरा कुठे प्रसिद्धी मिळाली ,
कि राजकारणी लोक कान टवकारतात,
त्यात आपला स्वतःचा फायदा काय होत आहे ते बघतात
आणि आपल्यात त्याला सामील करून घेतात.
तशी खिचडी हुशार . नव्हे, शहाणीच.
तिला भारतीय खास पदार्थ म्हणून संबोधलं जाणार
हे कळताच ,
तिने पापड, कढी , चटणी, लोणचं ,
बटाट्याच्या काचर्या , वगैरे मंडळींना बरोबर घेतले,
आणि सरकारला सुनावले.
"मी एकटीच खास नाही.
माझ्या बरोबरची मंडळी माझे कार्य
अधिकच सुंदर करतात,
आणि मला एकटीला भारताचा खास पदार्थ संबोधून,
कितीतरी रोटी, नान ,पराठा, परोटा , फुलका, इडली , डोसा,
उथप्पा , कोरी रोटी, मंडळींवर अन्याय होईल .
कितीतरी दुग्धजन्य , व इतर गोड पदार्थ डावलले जातील,
आणि भारताच्या खाद्य संस्कृतीत
विभाजकता माजेल.
देशातील राजकारण्यांची हि प्रथा असेल,
माझी नाही .
एखाद्या लहान मुलाने, कामावरून दमून आलेल्या गृहिणीने
अथवा फार भूक नसलेल्या आजी-आजोबांने
मला पुरस्कार दिला,
तर मी तो खाद्यसंस्कृतीचा खरा सन्मान समजीन.
आणि आयुष्यभर आनंदानं जपीन ..
आपल्या देशात , राजकीय पुरस्कार
आज काल जरा काही मनाविरुद्ध झालं
कि परत करतात .
मी त्यातली नाही . मला अवॉर्डवापसी जमत नाही .
प्लीज. मला माझ्या सहकाऱयांबरोबर एकट सोडा .
मी आयुष्यभर करत आले, ते करू दे.
साध्या माणसांना तृप्त करणे, आणि त्यांचे पोटभरणे .
जेणे करून त्यांना विश्रांतीत एक सुंदर
डुलकी लागेल ,
आणि सुखाची स्वप्न दिसतील.
तुम्हा राजकीय लोकांना हे आजपर्यंत जमलं का ?
| Dal and Rice have an Relationship.
Facebook would say , "It's complicated".
The Rice
is not expected to wander around
unaccompanied and unattended.
Sometimes by a Dal,infatuated by butter;
Sometimes , an intelligent coalition
with feungreek and spinach types;
Sometimes, a fighting union
with another dal,
coming to terms in ginger,garlic,
and tomato types;
and most of all,
in a display of Satwikness
of a high order,
A "Sadha Varan" preening in simplicity.
What really had the rice excited
was when the dals
started diving in as it was cooking,
accompanied
by similar actions by kadhipattas, cumin,
turmeric , agitated in ghee.
An overeaten spicy meal,
returning hungry andd tired from someplace,
and even suddenly having to make
a quick meal,
and Khichadi came into its own
Acche Din
across the country.
However, she suddenly got co-opted
as a country brand food
by the politicians,
who had their ears glued
to the potholed ground.
But Khichadi was smart.
She gathered together her team
of Papads, Kadhi, Chatni, Pickle,
GHee, and Batatyaachyaa Kachrya,
and actually told the government
what she thought.
"I am not special by myself.
All these folks here,
make my life beautiful,
and by branding me,
you are being unjust to my colleagues
Roti, Naan, Paratha, Parota , Fulkas,
Idlis, Dosas, Uthappas, Koro Roti,
and several dairy based special foods.
This will cause grevious division
in the Federation of Indian Foods.
This may be acceptable in politics,
but not by me.
IF I am honored with a prize
by a small child,
or a woman,
tired and back from work,
or grandparents ,
just wanting a one pot simple meal
I will be honored
and will guard the honor
all my life.
In this country,
if something does not agree
with someone,
they return the award.
That is not me.
I do not do award wapasi.
Just leave me alone
with my associates,
to do what I have always done.
To make ordinary folks happy
and satisfied with a meal;
perhaps satiated enough
to take a small nap
and see dreams of a happy future.
Have you politicians even managed
to succeed at that ? |