परकर पोल्क्यात्ले पुणे,काच्या मरून लंगडी खेळ्णारे पुणे
ऱस्ता ओलांडाय्ला वेळ लाग्तो म्हणून,
ड्राय्व्हर बस थाम्बवतो , ते पुणे,
सायकल वरून शाळेत जाताना साईड देणारे रिक्क्शावाले,
एक दोन वृत्तपत्रच अस्णरे पुणे,
ते माझे....
पर्वतिला गेल्यावर,
"आजींची नात आली" म्हणून
हातावर खोब्र्याचा प्रसाद आणि
साखरफुटाणे
देणारे पुणे,
आणि कॉलनीतला मुलगा
एस. एस. सी. ला पहिला आला,
म्हणून कॉलनीत्ल्याच धोब्यांनेच
पेढे वाट्ले ,
ते पुणे,
ते माझे....
हे अत्ताचे पुणे,
मी ओळ्खत नाही,
ते माझ्याबरोबर पुणे सोडून दूर गेले...
आता फक्त मनात असतं.....



