My doctor friend Asha, has fingers, which besides doing surgery, are also amazingly green, and she grows all kinds of stuff on her window sill grills.
Like these just (this morning, 22nd April) harvested Colcocasia leaves, purple stems and all, lying in wait before dedicating themselves to a great traditional maharashtrian vidarbha style recipe, in honor of the visiting daughter and new granddaughter.
Maybe the unseasonable drizzle and thunder the previous evening had something to do with it. Maybe , the impending elections, but the whole thing inspired a poem. In Marathi.
Because Aluchi Patal Bhaji doesn't happen in English. Just simply, अळूची पातळ भाजी !
:-)
Photo by Asha Shangarpawar.
पूर्वेच्या सूर्याच्या तेजात
रमलेले लहानपण ,
सहेल्यांबरोबर दाटीदाटीने
केलेली कुंडीतली कुजबुज,
ऐन वयात येताना
फ़ेअर आणि लवली च्या दिवसात
आलेल्या साडीवर
जांभळ्या रेषा व छटा
आणि एकामेकाना सम्भाळणारे
आणि खांद्यावर पसरणारे मोठे हिरवे पदर.
एक दिवस अचानक
पावसाचा शिडकावा ,
गर्जनेसहीत त्यांचे गृहस्थाश्रमात पदार्पण
वैद्यांच्या हाती विधी ,
आणि उरले सुरले आयुष्य चिंच दाणे डाळी बरोबर
घालवण्याची साधी स्वप्न …
आरोळ्या नाहीत,
सभा नाहीत
अग्रलेख नाहीत,
आयुष्यात जे यॆइल त्याला सामोरे जाणे
आणि आलेल्या माहेरवाशिणीच्या
स्वप्नातली भाजी बनून राहणे …
अबकी ताजी, अळूची भाजी …