Monday, November 2, 2015

एका सोन्पापडीची कहाणी


सोन पापडी .  अतीव श्रम करून बनवलेली  प्रचंड साखर , तूप, व मैदा-बेसन युक्त  मिठाई .  मारून मुटकून, ओढाताण करून, पुन्हा पुन्हा चार लोकांच्या मदतीने दम्दाटीने, लाटणी वापरून, रखरखीत हातांच्या अधीपत्त्याखाली जबरदस्तीने बनलेली  "नाजूक" मिठाई .

आणि मग कुठेरी अचानक कोणाचे तरी आयुष्य डोळ्यासमोर येते ….




रम्य बेसनाचे बालपण ,
आणि मैदा मैत्रिणी ,
आणि वितळ्त्या मेदातल्या किशोरीवयात

एका कडक कढईआत्या बरोबर
केलेला इथे तिथे प्रवास ,
उन्हाने आणि गर्मीने
चेहर्यावर आलेले तेज ,
आणि साखर सरकार ची त्यावर पडलेली नजर.

तिचे ह्या सर्वाला भूलणे,
"परात" राजवाड्यात जाणे,
आणि काही कळायच्या आत
कुणा सैन्याच्या हाती लागून
प्रचंड ओढाताण होणे.
दूर गेलो असे वाटणे,
आणि अचानक कोणीतरी
विकट लाटणे हास्य ऐकवत ,
परत पिरगाळून
असंख्य अगणित वेळा
तिला परातीत बसव्णे.

पिठिसाख्रेच्या बरोबर लाडू होण्याच्या ,
पिस्ता मंडळींबरोबर मोहन्थाळी राहण्याच्या दिवसात,
तिच्या आयुष्यातला हा सर्वात खडतर काळ,
आणि तरी सुधा
सर्व सहन करत
स्वतःची आयुष्याची अगदी लक्तरे करून ,
कुठेतरी देव आहे
अशी सोनेरी श्रद्धा ठेउन ,
ती मन घट्ट करते .

स्वतःच्या हात्तात काही नसताना
कुणा एकाच्या हुक्की प्रमाणे
वाटेल तसे ओढले मारले जाणे,
हात पाय धरून एका चौकोनी खोलीत डांबले जाणे
आणि
आयुष्याचे तुकडे तुकडे झाल्यावर
" किती नितळ तिचा चेहरा ,
किती सुंदर स्तर ,
दुधावरच्या सायीसारखी तिची त्वचा …."
असे म्हणत
काही उष्मानकांसाठी हापाप्लेल्या लोकांनी केलेले
आधाशी कौतुक .

सोन पापडी, तुझी ही स्त्री जन्माची कहाणी

No comments:

Post a Comment