Friday, November 20, 2015

ऐका बाजीराव … ऐका बाजीराव !


दिवाळी आली आणि बघता बघता गेली सुधा . फेसबुक मित्र  हृषीकेश परांजपे , ह्यांना कार्यालयातील सहकारयाने अचानक    चंदेरी तबकात अतिसुंदर चकल्या दिल्या, त्यांच्या (सहकार्यांच्या ) सासूबाईन्नी केलेल्या.

कौतुकाने ,  स्वतःला लगेच चव घेण्यापासून थोपवत, त्याने  हा फ़ोटो काढला आणि पोस्ट केला .

सुंदर भाजणी,  नाजुकसे काटे ,  इंग्रजी मध्ये ज्याला "come hither"  म्हणतात , असे हाव भाव , आणि स्वतः भोवती नेमक्या सुबक गिरक्या घेउन , तैल्परीक्षेत उत्तीर्ण होउन,    तरीही फ्रेश रहाणार्या   खुसखुशीत सोनेरी चकल्या.

मग उगीच सहज आठवलं .  स. ली . भंसाळी .  त्यांनी इतिहासाची कदर न करता ,  दोन व्यक्तींना , विकृत पणे एकत्र नृत्यात सादर करणे; सोनेरी, चंदेरी, गिरक्या , सर्व .

एव्ह्डच  समजलं .   चकलीला  उत्कृष्ट  taste  आहे.   भन्साळीन्ना अजिबात नाही


बा संजया, कुठे तुझा
दोन इतिहासातील सुंदर व्यक्तींचा
अनुचित व
त्यांच्या स्मृतीला
अपमानित करणारा नृत्य प्रयोग ,
आणि कुठे
एका रम्य दिवाळीत
कथ्थकी सोर्यातून,
नजाकतीने घेतलेल्या
कुणा एका चकलीच्या रेखीव ,
तेलात पडून सोनेरी झालेल्या
सफाईदार गिरक्या,
आणि मग चांदीच्या तबकात
दिलेली दिलखेचक पोझ ....

संजयाचा नवीन चित्रपट ,
हृषीकेश चकली .....!


No comments:

Post a Comment