माझ्या फेसबुक स्नेही, व निरनिराळ्या प्रकारच्या स्वयंपाकाचे प्रयोग करून बघणार्या, त्याचे वर्ग घेणार्या , आणि पारंपारिक स्वयंपाकात खूप रुची असणार्या सई कोरान्ने-खांडेकर यांनी त्यांच्या ओव्हन मध्ये काहीतरी गोड धोड भाजायला ठेवले, आणि त्यावर थोडी साखर पेरली .
कुठेतरी नकळत , आजूबाजूलाही साखर पडली , आणि जेव्हा ओव्हन उघडून पदार्थ बाहेर काढायची वेळ आली, तेव्हा खाली असलेल्या पार्च्मेण्ट कागदावर त्यांना हे असे सोन्याचे गोड मणी दिसले .
कोणाला माहित, आनंदाचे अश्रू पण असावेत ?
साखरप्याच्या माई ,
स्वतः कधी शाळेत गेल्या नाहीत
पण नातीनी मुलींनी भाच्यांनी शिकावं
म्हणून
त्यांना घेउन शहरात आल्या .
मुली नवीन प्रकार शिकल्या ,
नवीन नवीन अनोळखी लोकांशी
कस बोलायच ते शिकल्या,
कधी स्वतःचा अगदी चक्काचूर करून
लोणी मंडळींबरोबर जगायचं शिकल्या ,
कधी मैदा तुपाच्या यज्ञात
आत्मसमर्पण करायला शिकल्या ,
कधी उडत उडत हळूच फळांवर बसायला शिकल्या ,
तर कधी गरम पातेल्याच्या तळाशी
फेर आणि लवली विसरून,
खमंग झाल्या.
कौतुकाने एकदा साखरप्याच्या माई
त्यांच्या बरोबर गेल्या,
त्यांची गोडा वरची पेरणी,
त्यांचे सोनेरी बदल,
त्यांना केक्स्पर्शाने मिळालेला आदर ,
सर्व बघून धन्य झाल्या।
सभोवताली किती गरम होत
ते तर जाणवलेच नाही ,
पण जेव्हा लक्षात आलं ,
तेव्हा त्यांच्या डोळ्यातले
आनंदाचे गोड अश्रू
सगळी कडे सोन्याच्या मण्यान सारखे विखुरलेले होते ....