Monday, January 25, 2016

कोंबडीची गोष्ट .....


माझ्या फेसबुक स्नेही शांता कोणजे  यांनी  हा मजेदार फ़ोटो  पोस्ट  केला होता .

फ्लामिन्गो पक्षांचे हाय फाय थंड परदेशातून उडत येणे , पेज थ्री प्रकारचे नाजूक चालणे  ,  आपली अंडी समुद्रानजीकच्या खारफुटी (Mangrove) भागात  छुपव्णे ,  वेळ येताच उडून जाणे ,  आणि त्यांचे डोळे मिटून अनुकरण करणारी आपली  देशी सुंदर रंगांची देण असलेली कोंबडी .

मग उगीचच काहीतरी आठवलं


हुडहुडीच्या प्रदेशातून ,
समशीतोष्ण भारतिय प्रदेशात
गौर वर्णीय पाहुण्यांचे
हिवाळ्यात आगमन,
आखीव रेखीव कमनीय फ्लेमिंगो
ललनांचा नाजूक पदन्यास ,
आणि नेहमी प्रमाणे
आ वासून
इथे सर्वांनी सर्व बाबतीत त्यांची केलेली नक्कल .

साईझ झिरो ,
लांडे कपडे ,
विजारीवर फ्याशन च्या नावाखाली मारलेले
फाटके कट ,
आणि जीन्स वर पोटीमा ब्लाउज ….

आणि एक कोंबडी पळाली
तंगडी काठीला धरून
झोकात चालायला लागली
आणि आपलं खुराड ,
आपली अंडी
आपली माणसं विसरून अनुकरण करत बसली .

तिला काय माहित,
कि जमिनीशी नातं ज्यांचं असतं ,
त्यांचे पाय लांब नसतात ,
त्यांना धर्तीचे रंग सजवतात ,
त्यांना छान बाळसं धरलेलं अस्त,
त्यांच्या जगात
साईझ झिरो ,
लांडे कपडे ,
कधीच नसतात ,
आणि कट्स विजारी वर नसतात पण
त्यांच्या मानेवर असतात

कारण कितीही उंचावरून चाललं
तरी त्याना उडता येत नाही .…. 

No comments:

Post a Comment