Thursday, January 14, 2016

कोणी करंजी देता का, करंजी ?


माझे स्नेही , श्री विवेक पटवर्धन ,  नुकतेच वेस्ट इंडीज ला जाउन  आले,  आणि मायामी (फ्लोरिडा) मार्गे मायदेशी परतत आहेत. त्याना प्रवासात अनेक खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेता आला असे दिसते .

आर्जेन्टीन एम्पनाडाज़  ह्या नावाखाली  एका  दुकानाच्या खिडकीत चक्क  आपल्या करनज्यान सारखा पदार्थ दिसला .  त्यांनी ताबडतोब फ़ोटो काढून, फेसबुक वर टाकून मला खुणावले (tag केले).

आज समज्ताय ,  संजय लीला भन्सालीच्या बाजीरावला बघून खर्या बाजीरावना काय वाटले असेल . ….पूर्वी वनवासात जाण्याची स्टाईल होती,
कंद मुळ खाल्ली जायची ,
शिकार व्हायची ,
जादूच्या थाळ्या असायच्या,
आणि विविध संकटांशी सामना करून
चोर दैत्यांचा नाश करून,
मंडळी आपली पायपीट चालू ठेवायची
आणि सरते शेवटी
आपापल्या राज्यात परतून
मेज्वान्यात लाडू , कारंजी, पुरण्पोळ्या खाउन
आनद साजरा करायची .

आज काल
रवे मैदे  पर्देशी जातात ,
लक्ख मोहन बघून हरखून जातात ,
अण्ड्याशि  संगनमत करून
चीझी लोकांच्या मागे लागतात ,
आधीच इटलीच्या माफिया ला फितूर झालेल्या
टोमाटोला सामील होतात ,
आणि कहर म्हणजे
वृन्दावानात्ल्या तुळशीला  ह्या सर्वांबरोबर
बंदिस्त करून
चक्क भाजतात,
नाहीतर उकळत्या तेलात तळून काढतात .

कुणा एका परातीत
व्यवस्थित कुटून  , अंग कमावून
लाटणे लोकांचा आदर ठेउन
नारळ  खोबरे गुळाचा आनंदाने स्वीकार करणे ,
स्वतःला दुमडुन
वेळ प्रसंगी गुलाबी फ़ोडान्ना सहन करून
त्याना गरम तेलात संभाळणे ,
आणि अशा परिस्थितीत सुद्धा
स्वतःला नक्षीदार बनवून
लाडू चिवडा चिरोटे हायफाय प्रभूतीन्मध्ये
आपला मान राखून असणे ,
हे फक्त एक करंजीच करू शकते .

जिचा अर्थ "योद्धा" किंवा  "साधन"
असा आहे,
त्याची सर
अंडे आणि तुळशीला ला एकत्र आणणार्या ,
अर्ध्या चीजकुंडाने  नि फेर आणि लवली झालेल्या
स्वतःला एम्पनाड  म्हणणार्या
ह्या अर्जेण्टीना च्या
तोतया  बाजीरावला कशी येणार ?

1 comment:

  1. खात्रीलायक वृत्तानुसार इम्पनाडाच्या पोटात कोंबडीदेखील असते!

    ReplyDelete