Tuesday, August 23, 2016

कडधान्यांचे ऑलिम्पिक ...


माझी मैत्रीण , कर्काळ , कर्नाटक, येथे राहणारी , शची फडके , हिने परवा हा खालील फोटो पोस्ट केला , आणि सर्वांना ओळखायला सांगितले. 

प्रथम दर्शनी  एखाद्या सागरी प्राण्यासारखा दिसणारा हा पदार्थ ,  प्राणी तर नव्हताच.  मग सगळ्यांना आलेले मोड दिसले , आणि तरी कुठले कडधान्य ते कळेना  ! 

गौप्य्स्फोट !  हे मोडे आलेले कुळीथ आहेत !  भिजवून, चाळणीतून काढून, एका स्वच्छ  फडक्यात  घट्ट बांधून एका उबदार ठिकाणी ठेवल्यावर , मोडाना  स्फुरण चढते, आणि कशालाही न जुमानता ते  विजय पुकारत सूक्ष्मत सूक्ष्म जागांतून जणू पदकं घेऊन बाहेर पडतात .  

तरीच. कोणाची तरी प्रेरणा असणारच ..... 

 

सिंधू, दीपा आणि अदिती
यांच्या पासून प्रेरणा घेऊन ,
अथक परिश्रम करून,
समाजाच्या, चाळणीच्या आणि
विवध फडक्यांच्या अन्याय्य अपेक्षांना
धीराने तोंड देऊन ,
चमकदार खेळी करून,
फेअर आणि लव्हली फडक्याला
उत्कृष्ट प्रकारे हरवून ,
सुवर्ण पदक मिळवणारे
कुळीथाचे  मोड !

ता . क. कुळीथाच्या  जागी मसूर, चवळी , वाल  असले तरी सुवर्णपदक ग्यारंटीड आहे

No comments:

Post a Comment