Sunday, October 2, 2016

Ms Kakdi Dhondas-Tausali : a biography


My friend Shakti Salgaonkar-Yezdani  had the good fortune to eat a native traditional Malwani dish called Dhondas in Kokan.  A sweet dish prepared from  cucumber, rice rawa, jaggery  and coconut, all available in plenty in the coastal areas, , she had this dish, steamed and then lightly shallow fried in home made ghee.

She posted this photograph possibly just before devouring the goodies.

It falls to us proletarian folks, to simply look at photos,  salivate, and hope that there is some Dhondas in our future.

In the meanwhile, turns out that this dish is also called Tausali in Goa. Never mind. For those who might want to know the antecedents of Ms Kakdi Dhondas-Tausali , here goes : 



एक शेलाटी बांध्याची ,
हिरवीगार काकडी ,
​अस्वस्थ, दुःखी ,
आणि
रवे रावांची आठवण काढत,
विचार करून , सगळ्याच कीस काढून
झालेला अश्रुपात .

कोणाचेही दुःख न बघवणारे
गूळ आबा , आणि खोबरे आजी ,
तिचा मूक आक्रोश बघून हेलावून गेले,
आणि समजूत काढायला आले .
साजूक तुपाला निरोप गेले,
तांदुळाच्या रव्याला भाजून समज दिली गेली ,
आणि एका बाजूला
स्वतःच्याच विचारत मुरलेली काकडी ,
त्याला बघताच आनंदली .

नेहमीची इलायची , काजू बदाम मंडळी ,
मागे मागे येऊन त्यांना मिळाली ,
आणि "मी पण", "मी पण" म्हणत
चीणभर मीठ पण येऊन थडकले.

"आयुष्यात नुसती धावपळ चालत नाही ,
थोडा वेळ स्वस्थ बसलं , तर सगळं कसं
नीट जमून येतं "
ह्या खोबरे आजींच्या सूचनेला गूळ आजोबांचा दुजोरा ,
आणि मग
एका ताटलीत बसून
सर्वांनचा वाफेतून मने स्वच्छ करणारा प्रवास .

मग मनं थंड होणे ,
सर्वांचे एकत्र राहणे ,
आणि कौतुकाने कधीतरी
एखादा आनंदी तुकडा
एका आईने आपल्या माहेरवाशिणीला
"घे ग ! आमच्या पद्धतीचा केक !
असं म्हणून खाऊ घालणे .

आणि एका तसराळ्यातील नुकतीच आलेली काकडी
हे सर्व बघून
अगदी हुरळून गेली ....

No comments:

Post a Comment