Ever prepared three different stuffed veggies in a single unified dish ? NO ? My friend Shruti Nargundkar of Melbourne, actually did this, put a picture, gave clues via a Marathi short poem, and challenged folks to guess what veggies had participated.
The clue :
दोन गावरान गब्रू , एक पाहुणा भाऊ
मसाला भरून तेलात शिजले बरे मऊ
एक गोड कोवळा तर दुसरा जहर कडू
पाहूणा आंबट हिरवा, कच्चाच खेळाडू
पोखरून मसाले भरून फोडणीत पडले
भेदभाव संपवून ग्रेव्हीशी समरस झाले
चमचमीत भाजी झाली भारी चटकन
शिलेदार अनोखे ओळखा पाहू पटकन!
मसाला भरून तेलात शिजले बरे मऊ
एक गोड कोवळा तर दुसरा जहर कडू
पाहूणा आंबट हिरवा, कच्चाच खेळाडू
पोखरून मसाले भरून फोडणीत पडले
भेदभाव संपवून ग्रेव्हीशी समरस झाले
चमचमीत भाजी झाली भारी चटकन
शिलेदार अनोखे ओळखा पाहू पटकन!
While scores of ladies went ballistic guessing the stuff over a couple of hours, turns out that the answer was, green tomato, bitter gourd(karela) , and snake gourd (padwal).
Naturally, one looked for a lesson in all this . Then i found it, first in Marathi, and then in English.
काही कमनीय पण काटेदार , काही लांबसडक , लवचिक आणि फिके. एकमेकाला ओझरते दृष्टीक्षेप फेकत राजकारण्यांसारखे खलबते करत एकमेकांशी न बोलत फ्रीजच्या एका खणात. मग सौ नरगुंदकर सभापत्नींचे आगमन , गलेलठ्ठ गोल कच्च्या टोमॅटोची बारियाट्रिक गरी शस्त्रक्रिया , कमनीय काटेदार कारल्याच्या बियांना सोडवणे , आणि लांबसडक पडवळाची , आई ग ऊई ग ला न जुमानून केलेली अंतर्गत सफाई. सर्वांच्या आपापसात फाटाफुटीचे कारण समजून घेऊन, सभापत्नीबाईंनी , गर ,बिया, आणि पडवळीय वस्तू एकत्रित केल्या , त्याना बेसन, कांदा, दाणेकूट, व तिळकूटाचे धडे देऊन, वर आले, लसूण, मिरची, धने जिरे, हळद , मिठाचे मार्क देऊन व्यवस्थित समज दिली , आणि मग थोडी दया येऊन गूळ आणि ओला खोबर्याची ट्रीट . एकामेकाशी न बोलणारे, कौतुकाने मसाल्याला तपासून, स्वतःसाठी भरपूर, काबीज करून गच्चं भरून बसले. देशाच्या लंगडीत एकत्र शिजले , आणि गुण्या गोविंद्याने वागत प्लेटीत पोचले. भारतरत्न जोडी भाकरीराव आणि पिठलीणबाई वाट बघून बघून थकलेले ... पण त्यांना माहीत होतं , राजकारणी लोकांना मसाला जनतेला सोडून काही करता येत नाही. काय माहीत, पुढच्या वेळी वांगं निवडून यायचं .... |
Some rotund, hefty and fat, some shapely, but a bit thorny and some long, dull and spineless. Disinterested glances, they sat like politicians, scheming yet ,ignoring each other in a refrigerator shelf. Enter Mrs Nargundkar, the Speaker Ma'am. Then a bariatric surgery of the innards of the green tomato; a daring rescue of the seeds of the bitter gourd; and, ignoring the pleas, a scraping and clearing the plaque inside the snake gourd. She puts them all together, the rescued stuff, and decides to teach a lesson with besan, onions, roasted groundnut and sesame powders, with some ginger, garlic, chilly, turmeric, coriander, cumin and salt footnotes. The in a generous mood, a treat of fresh coconut and jaggery. The three, the tomato and gourd cousins, enamoured of the stuff, like typical politicians, rushed to appropriate it and stuffed themselves to the gills, cooking together happily in the country pan, arriving in unity on to the plate . Our Bharat Ratna pair of Bhakri Rao and Pithlin Bai had been waiting with great anticipation, and understanding. They knew, you can't separate the politicians from the voters. Who knows ? Next time a brinjal may get elected .... |
मस्तच
ReplyDelete