माझा फेसबुकी मित्र
हृषिकेश परांजपे ह्यानी अचानक "अंगत पंगत" ह्या महाराष्ट्रीय / मराठी
पारंपरिक स्वयंपाकाच्या ग्रुप मध्ये कोकम रसाचे, लिची रस , लिंबूरस , आणि
व्होडका घातलेले एका कॉकटेलचे फोटो-चित्र टाकले. मग त्यात अख्खी हिरवी
मिरची चिरून घाला असं कोणीतरी सुचवलं .
माझं वय हृषीकेश च्या दुप्पट . लहानपणी कोणी दारू पितात असा समजलं , की ते थेट झिंगून पडलेले डोळ्यासमोर दिसायचे. आता त्याचं हसू येतं .
घरात नेहमी कुठलेही कोले अथवा दारूचे प्रकार न ठेवणारी मी , जराशी थबकले .
आणि मग त्यातला विनोद दिसला.
कोकणातले एक जुनं रातांब्याचं झाड ,
कष्टाने आपली मलूल पाने
लपवत ,
स्वयंपाकघरातील गप्पा ऐकत होतं
गोदाताई जरा दचकल्याच,
आणि गौरीताईं कडे एक
घारा कटाक्ष टाकून
म्हणाल्या ,
"तरी मी अण्णाला सांगत होते ,
बेबीला मुंबईला शिकायला पाठवू नकोस ...
माझ्या मेलीचं ऐकताय कोण? "
गौरीताई चपापल्या ,
कोकम सरबताचा घोट घेऊन
डोक्यात अनेक विचार आले ,
आणि घश्याखाली गेले.
बेबी, एक हुशार मुलगी,
शिकायला आणि नोकरी निमित्त
मुंबईला ,
आणि मग शुभमंगल सावधान !
गोदाताईनी भाजीवर झाकण ठेवलं
आणि रातांब्याच्या झाडाच्या वतीने
कळकळीने उदगारल्या ,
" अगं , कोकम सरबतात लिंबू
हा तर आमचा शोध ,
आणि आता हे कोणाची कोण लिची
पिळून घालतात ,
पेल्यावर कोथिंबीर लटकवतात ,
बर्फ टाकतात ,
आणि मग चक्क दारू घालतात ? "
गौरीताईंच्या हातातून
कोकमचा पेला खळ्ळकन पडला .
रातांब्याच्या झाडाला पाणी शिंपडत ,
शुद्ध करत,
दोघी फिरल्या,
आणि गौरीताई जाता जाता म्हणाल्या ,
"बेबीला म्हणावं ,
शुभमंगल झाल, पण आता सावधान रहा ग !
कोणीतरी सांगत होतं ,
परांजप्यान्चा हृषिकेश ह्यात हिरवी मिरची उभी चिरून घालतो ? ... "
कष्टाने आपली मलूल पाने
लपवत ,
स्वयंपाकघरातील गप्पा ऐकत होतं
गोदाताई जरा दचकल्याच,
आणि गौरीताईं कडे एक
घारा कटाक्ष टाकून
म्हणाल्या ,
"तरी मी अण्णाला सांगत होते ,
बेबीला मुंबईला शिकायला पाठवू नकोस ...
माझ्या मेलीचं ऐकताय कोण? "
गौरीताई चपापल्या ,
कोकम सरबताचा घोट घेऊन
डोक्यात अनेक विचार आले ,
आणि घश्याखाली गेले.
बेबी, एक हुशार मुलगी,
शिकायला आणि नोकरी निमित्त
मुंबईला ,
आणि मग शुभमंगल सावधान !
गोदाताईनी भाजीवर झाकण ठेवलं
आणि रातांब्याच्या झाडाच्या वतीने
कळकळीने उदगारल्या ,
" अगं , कोकम सरबतात लिंबू
हा तर आमचा शोध ,
आणि आता हे कोणाची कोण लिची
पिळून घालतात ,
पेल्यावर कोथिंबीर लटकवतात ,
बर्फ टाकतात ,
आणि मग चक्क दारू घालतात ? "
गौरीताईंच्या हातातून
कोकमचा पेला खळ्ळकन पडला .
रातांब्याच्या झाडाला पाणी शिंपडत ,
शुद्ध करत,
दोघी फिरल्या,
आणि गौरीताई जाता जाता म्हणाल्या ,
"बेबीला म्हणावं ,
शुभमंगल झाल, पण आता सावधान रहा ग !
कोणीतरी सांगत होतं ,
परांजप्यान्चा हृषिकेश ह्यात हिरवी मिरची उभी चिरून घालतो ? ... "
No comments:
Post a Comment