Thursday, September 24, 2015

नित्यनेमाने प्यावे बीनामृत....


फारसा सुग्रणपणा नसला, आणि खाण्यात इंटरेस्ट असला न, कि कविता सुचतात .

फेसबुक वर कधी कधी  उपयुक्त माहिती मिळते .  

आज सकाळी  एका मैत्रिणीकडे ताजे पावटे होते , आणि तिला त्यांचा पुलाव बनवायचा होता .  सहज  तिने फेसबुक ग्रूप वर सवाल टाकला , आणि   इतक्या लोकांनी उत्तरे दिली कि चक्क सकाळी सकाळी  "बीनामृत "  प्यायल्ल्याचा आनंद मिळाला.

किती प्रकारच्या सोललेल्या  शेंगा, कडधान्य वाल, त्यांचे विविध रंग, आकार,  स्वभाव, व त्यांच्या भाज्या बनवायच्या पद्धतींबद्दल खूप समजलं …।

मग उगीचच  वाटलं ,  आपल्यात सुधा किती विविधता आहे आणि माणसांना सुधा त्यांच्याकडून थोडे फार शिक्ण्यासार्खे आहे ….

 


ह्या सगळ्या शेंगा , आणि बीन्स
म्हणजे छोटा भारतच अहेत.


कोणी जुन्या पद्धतीच्या आवरणात ,
कधीतरी रात्रभर अभ्यन्ग्स्नानात गुंग,
मग
सकाळी कपडे बदलून स्वस्थ
आणि कधीतरी मग
"मोड भव" असा आशीर्वाद मिळून,
नव्या कशाची तरी चाहूल .

कोणी स्वतःला फेर अंड लव्हली समजून
पाण्यात मनोसक्त डुंबून,
वाफेचे फ़ेशल करत ,
कुणा कुणाच्या शिट्ट्या ऐकत
नविन दिवसाला सज्ज…

कोणी मुळातच कमनीय श्यामल वर्ण सुंदर्या ,
ह्याही पाण्यात विहारतात,
आणि वाफेशी खेळता खेळता लाझून
पाण्याला गुलाबी करतात .

काही शांत , गडद काळ्या घेवड्याचे वंशज ,
कोणाशी न मिसळता
कांदा लसुणाची स्वप्न बघत
आपल्याच धुंदित मग्न।

श्रावणात बाहेर न पडलेले घेवडे ,
आपपाल्या शेंगातून ,
"श्रावणात घननिळा" गात ,
गुलाबी छटा दाखवत भाद्रपदात बाहेर
आणि
आपले गाव सोडून
देश बघायला बाहेर पडलेल्या
दुरंगी राज्म्यान्नॆ त्यांचे केलेले स्वागत

एकिकडे अचानक मग भाज्यांच्या निवडणुकीत
पार्टीने तिकीट दिल्याच्या अहंकारात
पावट्याञ्चा उग्र पावित्रा …

रंग, रूप, जात, कूळ कुठलेही असो ,
कोणि एकट कधीही नसत ;
सगळ्यांच्या विकासासाठी
कांदे , लसून, आले, खोबरं , मसाले , चिंच,
टोमाटो , जिरे
हे सर्व आणि बरेच कोणी ,
राष्ट्रीय शेंगा उत्कर्ष अभियाना तर्फे
कायम हजर असतात.

आज
ऐक्य आपल्याला समजत नाही
पण शेंगाना कळतं न !

No comments:

Post a Comment