Saturday, May 31, 2014

इश्श्य ! आम्ही नाही जा …


There are very few folks who can cook, write, and take such outstanding photographs of what they cook, that they imbibe the dish with human qualities. If you know what I mean.

My blogger and FB friend, Shruti Nargundkar of Melbourne is one such. She recently participated in a breakfast contest as part of a Facebook group called Sikandalous Cuisine,  and her writeup, with a great mix of memories and cooking instructions was greatly applauded by all the members.

This dosa , as clicked by her, is clearly overcome by all the attention, and the curve of the dosa reminded me of something. Unfortunately, I am unable to translate it into English.

For all my friends who read and understand Marathi,  here it is ...
  
लहानपणापासून डोळ्यासमोर
डाळ तांदुळाचे आदर्श,
काहींचे उकडे पारदर्शक व्यक्तिमत्व,
रात्र रात्र जागून , तरी पण
फ्रेश राहून कमावलेले 
हलके फुलके चेहरे,
मेथी आजींचा मान राखून
थोडेसे आठवणींचे दाणे ;
सर्व एकत्र करून
ती आपल्याच स्वप्नांच्या उबेत
गुरफटून बसते .

दुसर्या दिवशी
सकाळी सकाळी
विस्तवाला स्मरून, देवाचे नाव घेउन
ती डावाला सामोरी जाते,
आणि चटके बसले तरी
"अरे संसार संसार " म्हणात
तव्यावर ऐसपैस पसरते .
सोनेरी छटा यायच्या आधी
थोडी झाकणाखालि लपते,
आणि चटणीशी दोन बोटे करण्याची
मनाची तयारी कर्ते.

अचानक एक मोठी खोली,
स्वच्च प्लेट मध्ये ती उतरते ,
आणि भोवताली इतक्या
टाळ्या वाजवणार्या सिकनदलीय महिलां
बघून लाजते ,
आपलाच सोनेरी पदर
स्वतः भोवती गोल गुंडाळून
घेते,
आणि चटणी कडे पाठ फिरवून म्हणते,
"इश्श्य ! आम्ही  नाही जा …।"

2 comments:

  1. आता “इश्श्य” हा शब्द हद्दपार झाल्यात जमा आहे. देवदास बघुन मराठी मुलींना वाटते की हा बंगाली शब्द आहे. इश्श्य वापरल्याबद्दल तुमचे अभिनंदन! कवितेची भट्टी झकास जमली आहे. प्रथम मला वाटले की ‘तो’ डोसा आणि ‘ती’ चटणी यांचे प्रेमगीत असावे. शेवटच्या कडव्यात चटणीचा खमंगपणा व डोश्याचा कुरकुरीतपणा यांच्यासोबत मिश्कीलपणा छान!

    ReplyDelete