Regrettably, the Monsoon (or the month of Shravan) brings some other things to mind, in Mumbai. The newspapers have been full of it, I've blogged about it, people have got injured travelling on it: Yes, the potholes on Mumbai's roads.
This is a parody of the late Balkavi's poem, with apologies to the memory of the great poet.
An English translation might work, but the beauty of the cadence, rhythm, and color of the original Marathi poetry will be lost. Hence , not attempted.
श्रावण मासी , दुक्ख मानसी , खड्डे खड्डे चोहिकडे ,
क्षणात येई भुरभुर माती , क्षणात गाडी उलटी पड़े
वरती बघता गोफ धूराचा बस च्या मागून विणलासे,
चिक्क्हल तोरण काय बांधले सभोवताली कुणी भासे,
झालीच टक्कर म्हाशीशी , जबड़ा -अहाहा तो उघडे
घाणीत घसरुनी पाय मोडला , काय करू हां प्रश्न पडे
उठता वरती गर्दी जमली ,अनंत रिकामे बघे पहा
गमबूट घालून पोलीस आले , शिट्टी वाजवत , अहा !
नाव काय , पत्ता , लायसंस दाखवा, व ते पट्टा सावरती
आपण आता घरी कस जावे , हे विचार मनात बागडती
रिकक्षा ही चलते भुवनी , तो चालक गाणी गात फिरे
"बसा " म्हणोनी , मीटर पाडत, रेडिओ वाजे एकसुरे...
सर्वत्र डाम्बर चिकट पडोनी , वास एव्ह्डा दरवळला
गाडी उचालणारी गाडी बघुनी रोष मनीचा मावळला...
सुंदर पावतिपुस्तक घेऊनि हाती, पुलीस हात धरे पुढती ,
सुन्दर अक्षर , सुन्दर अकडा , चुपचाप पुस्तकी ते खुडती
घर दर्शना निघती लोक , काळजी मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत......






No comments:
Post a Comment