Sunday, December 14, 2014

एका कलिंगडाची दुसरी गोष्ट


Somehow "Watermelon Rind Badis" doesnt sound as nice as कलिङ्ग्डाच्या सालीचे सांडगे, if you know what I mean.

My friend Shruti Nargundkar of Melbourne, writes a wonderfully nostalagic  post about holiday afternoons in her childhood, spent delightfully guarding special spicy items made out of watermelon rind, and set out to dry on the house terrace or  yard.
 

It isn't just about the taste and the convenience.

It is about the philosophy of the immense energy that goes into growing something and taking it to its logical end;   of utilising every possible part of it, in a unifyng manner, and passing all these values to future generations, so they too, can learn .


कुणा एका नदीच्या वाळ्वणटात
गेलेले बालपण ,
कडक कोरड्या उन्हाच्या विद्यालयात

लागलेली शिस्त,
आणि वयात आलेली हिरव्या
नक्षीची कलिंगडा,
आपल्या देठाशी आलेली कुरळी
वाळलेली बट ,
हळूच बाजूला सारते ,
आणि एका मोठ्या टोपलीत बसून
सासरच्या मार्गी लाग्ते.

आजकालच्या
वापरा आणि फेका संस्कृतीच्या विरोधात
ऐन यौवनात तिने केलेलि चळवळ,
वंशाचे काळे पांढरे पिवळे दिवे
व्यवस्थित सांभाळणारी,
डोक्यावर सासरच्या थपडा झेलणारी,
दिवसे दिवस गोड मानणारी ,
अश्रू ढाळीत का होईना,
पण स्वतःचे चंद्रकोरीच्या आकारात
असंख्य तुकडे करून जीव लावणारी कलिंगडा ,
शेवट पर्यंत देतच रहते.
देतच रहते.

कुठे आजच्या नाटकी जगात
"माझ्या चामड्याचे जोडे बनवून
चरणी अर्पण करीन "
असं उदगारणारी आम्र सौदर्यवति ,
आणि कुठे
आपले यौवन अर्पण केल्यावर सुधा
उरले सुरले सर्व
पोहे, बेसन, मिरची , हिंग , जिरे,
व तिळाच्या मदतीने,
एकटवून ,
सूर्याची उपासना करून
आपल्या अनेक वन्श्जान्साठी
सांडगे रुपी उरणारी कलिंगडा ….

ह्या कलियुगी जगात
आम्र सौदर्यवति राणी ठरते ,
पण कलिंगडा
बरण्या व डबे भरभरून
अनेकांच्या घरी
जगभर विहारते,
आणि कधीतरी
दूर कुठेतरी ,
एका बर्फ़ाळ्लेल्या संध्याकाळी
वाफाळलेल्या वरण भाताला
चार चांद लावते …

No comments:

Post a Comment