Wednesday, April 29, 2015

शुभेच्छा !


My friend Shubhada Gokhale of Melbourne,  makes wonderful poems,  and two generations of her family probably keep her busy celebrating birthdays and anniversaries often.  Someone's  fifteenth anniversary  probably led to this spread, and she recently posted this photograph.

Thanks to the Internet and globalization of food, one enjoys desserts of so any types.  One also respects those that prefer to be simple and concentrate on dry fruits instead.

Interpreting this visual, the centre of the dry fruit platter , lent itself to remembering some thing, we have enjoyed as children.  And as in my childhood, even now, one could not hold one's self back  .....     (I am sure it was something else. But it is so much more fun thinking of it this way ...)

Puzzled ?   Read on ...                   :-)    

सोसासोसाने
शेजारच्या केक ताई ला
फ़ेअर आणि लव्हली फासून,
न रहावून त्यावर चोकोलेटची
रांगोळी काढून ,
"जरा स्वस्थ बसा ग"
असा आजूबाजूच्या लाल बच्चा मंडळीना दमात घेउन,
 शेवटच्या क्षणी ,
गडबडीने बनलेला दुसरा एक केक
गालावर बदाम्माचे काप फासतो
आणि पोज घेउन आमरसाच्या आवरणाखाली
एकिकडे चुपचाप
सुरिवल्याच्या आगमनाची धास्ती घेउन
गप्प पडून रहतो. .


चक्का  जेलेटिन वय लपवणारी क्रीम
सफ़ैदार्पणे लाउन
फुला पानाच्या रुपात थोडे चोकोलेटचे शिडकावे
इकडे तिकडे झटकून
आपला सामान्यांन मधला वावर
जगाला जाहीर करत
कम्युनिस्ट सुरी शेजारी
स्टाईल मध्ये बसलेली चीजकेका .


आणि ह्या सगळ्या लोकात
एका बाजूला  एकत्र बसून ,
दाटी दाटी ने सर्व कार्यक्रम बघणारे
साधे सुधे खजूर .
सल्फर  मेकप ने रंगात आलेले
वाट बघून बघून
वळून दमलेले एप्रिकोट,
नेहमीच्या सवई प्रमाणे
लख लख चंदेरी गुणगुणत,
त्यात गुर्फ़ट्लेल्या मिण्ट्स ।


आणि एक आजी
कौतुकाने सर्व  बघत,
अचानक काहीतरी लक्षात आल्यासारखं करतात
आणि म्हणतात ,
"अगोबाई ! हे मध्यभागी हवाबाण हरडे कि काय ?  "

No comments:

Post a Comment